Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

डॉ.बापूसाहेब काळदाते स्मृती वक्तृत्व स्पर्धेत दत्तात्रय घुगे सर्वप्रथम

भाषिक कौशल्य,सहजता आणि स्पष्टता यश प्राप्त करून देते -प्रभारी प्राचार्य डॉ.डी.बी.तांदूळजेकर

अंबाजोगाई  येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात १ डिसेंबर रोजी डॉ.बापूसाहेब काळदाते स्मृती वक्तृत्व स्पर्धा-२०२१ मराठवाडा विभागीय महाविद्यालयीन स्पर्धा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,विभागीय केंद्र अंबाजोगाई, पू.नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठान विभागीय केंद्र अंबाजोगाई, बापु-सुधा काळदाते प्रतिष्ठान, औरंगाबाद व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,अंबाजोगाईच्या वतीने आयोजित मराठवाडा विभागीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील एम.कॉम द्वितीय वर्षातील विद्यार्थी दत्तात्रय घुगे याने सर्वप्रथम क्रमांक मिळविला.
यावेळी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस तथा औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे आ.सतीशभाऊ चव्हाण यांच्या हस्ते रू.१५,०००/- रोख,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र रूपाने बक्षिस प्राप्त केले.या यशाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ.डी.बी.तांदूळजेकर यांनी उपस्थितांना सांगितले की,स्पर्धा कोणतीही असो आत्मविश्वास व ज्ञानाने सहज जिंकता येते.वक्तृत्व हि आपल्या ज्ञानाची चुणूक नियोजित वेळेत दाखवून प्राविण्य मिळविण्याची कला आहे.सहजता, भाषिक कौशल्याने आणि प्रभावीपणे विषय मांडताना आत्मविश्वास यशाला गवसणी घालून देतो त्यामुळे जीवनात,स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा ठरतो असे प्रतिपादन प्रभारी प्राचार्य डॉ.डी.बी.तांदूळजेकर यांनी केले.वाणिज्य शाखेच्या पदव्युत्तर पदवीस शिकणाऱ्या दत्तात्रय घुगे याने यापूर्वी हि अनेक वक्तृत्व स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे.वक्तृत्व स्पर्धेत "समाजवादाचे भवितव्य" या विषयावर आपले विचार व्यक्त केले.वेगळ्या विषयांची मांडणी करण्याची शैली व वेळेचे नियोजन यावर त्याने स्पर्धा यशस्वी केली.त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ.नरेंद्र काळे,अमरराव देशमुख,सय्यद पाशु करीम यांनी विजेत्या स्पर्धकाचे कौतुक केले.प्रभारी प्राचार्य डॉ.डी.बी.तांदूळजेकर,उपप्राचार्य डॉ.रमेश शिंदे,प्रा.प्रताप जाधव प्रा.हनुमंत कलबुर्गे तसेच डॉ.सुरेश पाटील (इर्लेकर),डॉ.मुकुंद राजपंखे,डॉ.दिनकर तांदळे,डॉ.अहिल्या बरूरे,डॉ.इंद्रजीत भगत,डॉ.दिलीप भिसे,डॉ.अनंत मरकाळे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Thursday 2nd of December 2021 07:28 PM

Advertisement

Advertisement