Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

जिल्हा व सत्र न्यायालय अंबाजोगाई येथे ११डिसेंबर रोजी लोकन्यायालयाचे आयोजन

अंबाजोगाई-: येथील जिल्हा व सत्र न्यायालयात  ११ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

                 राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखलपुर्व प्रकरणे, धनादेश अनादराची प्रकरणे, दिवाणी दावे, बँकाची कर्ज प्रकरणे, कौटूंबिक कलह प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. या प्रकरणांमध्ये तडजोड झाल्यास शंभर टकके न्यायालयीन शुल्क परत मिळते. तरी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक सौ.सुप्रिया  सापटणेकर, अंबाजोगाई  वकील संघाचे  अध्यक्ष शरद लोमटे व पदाधिकारी यांनी  केले आहे.

Thursday 2nd of December 2021 07:23 PM

Advertisement

Advertisement