Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

कोवीड काळात माझ्या पेक्षा ही अधिक काम रेसिडेंट डॉक्टरांनी केले

डॉ. विशाल लेंडे यांचे मत

अंबाजोगाई  -  कोवीडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये मी केलेल्या कामापेक्षा कितीतरी अधिक पटीने चांगले काम मेडिसीन विभागात कार्यरत असणाऱ्या रेसिडेंट डॉक्टरांनी केले असे मत मेडिसीन विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ.विशाल लेडे यांनी व्यक्त केले.

     डॉ. विशाल लेडे यांचा स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाशी असलेला वैद्यकीय सेवा कालावधीचा निश्र्चित कालावधी (बॉंड) संपला असल्यामुळे आणि कौटुंबिक अडचणींमुळे त्यांनी स्वाराती मधील वैद्यकीय सेवा पुन्हा कंटीनीव्ह न करता आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे डॉ. विशाल लेडे यांना मेडिसीन विभागाच्या वतीने निरोप देण्यात आला. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ ‌ लेडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, अविनाश मुडेगावकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय चव्हाण हे उपस्थित होते.

      आपल्या विस्तारीत भाषणात डॉ. विशाल लेडे पुढे म्हणाला की, मी वैद्यकीय महाविद्यालयात २०१६ साली  मेडिसीन विभागाचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आलो होतो. ज्या गावाचे नाव फारसे ऐकण्यात नाही, ज्यागावाला आपण कधीही गेलो नाही, जे गाव यापुर्वी कधीही पाहीले नाही अशा गावात सलग तीन वर्षे शिक्षण घेणे खुप कठीण वाटत होते. मात्र हळुहळु सर्व अढचणींचा सामना करीत मी या गावात चांगलाच रमलो. मेडिसीन विभागात लेक्चरर ते असोसिएट प्रोफेसर या पदापर्यंत मी पोहोचलो.

    वर्षभरापुर्वी आलेल्या कोवीड महामारीमध्ये मी केलेल्या कामांचा अनेकजण सातत्याने गौरवाने उल्लेख करतात, खरे तर माझ्यापेक्षाही कितीतरी अधिक पटीने मेडिसीन विभागातील रेसिडेंट डॉक्टरांनी काम केले आहे. त्यांचाही वारंवार उल्लेख होणे आवश्यक आहे. 

   माझ्या वैद्यकीय सेवा काळात मी वैद्यकीय महाविद्यालयाशी, विशेष करून  बहुसंख्य अंबाजोगाईशी जोडला गेलो. या सहा वर्षांच्या काळात  अंबाजोगाई शहराने माझ्यावर जे प्रेम दिले ते कधीही न विसरता येणारे असुन आयुष्यात शेवटपर्यंत हा स्नेह, माझ्या सोबत राहील जिव्हाळा असे मत डॉ. विशाल लेडे यांनी व्यक्त केले.

      प्रारंभी डॉ. कल्याणी यांनी रेसिडेंट डॉक्टरांच्या वतीने डॉ. विशाल यांच्या कार्याचा गौरव केला तर ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, अविनाश मुडेगावकर यांनी डॉ. विशाल लेडे यांच्या कार्याचा गौरवाने उल्लेख केला. तर अध्यक्षीय समारोपात डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी डॉ. विशाल लेडे यांच्या कार्याची प्रशंसा करीत रेसिडेंट डॉक्टरांनी त्यांच्या कामाचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले.

    मेडिसीन विभागाच्या कॉन्फरनृस हॉल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रणिता यांनी केले तर डॉ. सचीन चौधरी यांनी आभार मानले.

Wednesday 1st of December 2021 07:18 PM

Advertisement

Advertisement