Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

कोविड काळात निस्वार्थपणे काम करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम राजकिशोर मोदी करत आहेत - आ संजय दौंड

अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या वतीने कोव्हिड योध्दा सत्कार संपन्न

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- जागतिक महामारीने साऱ्या जगाला हादरवून टाकले होते . माणसापासून माणूस दूर करण्याचे काम कोरोनाने केले आहे .मात्र अश्या ही परिस्थितीत देखील काहीजण आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांसाठी झटत होते .अश्याच निस्वार्थ काम करणाऱ्या लोकांच्या पाठीवर कौतुकाची आणि शाबासकीची थाप देण्याचे काम राजकिशोर मोदी हे करत असल्याची भावना विधानपरिषदेचे सदस्य आमदार संजय दौंड यांनी व्यक्त केली .ते  अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेच्या वतीने आयोजित अधिसेविका , अधिपरिचरिका , स्वच्छता कर्मचारी , कोरोना योध्दा सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते . यावेळी व्यासपीठावर अंबाजोगाई पिपल्स बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी , स्वा रा ती चे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे  , वैद्यकीय अधीक्षक डॉ राकेश जाधव ,  उप अधीक्षक डॉ विश्वजित पवार ,नगरसेवक महादेव आदमाणे , डॉ विशाल लेंडे ,  मेट्रन भताने मॅडम ,बँकेचे संचालक प्रा .वसंत चव्हाण ,  हाजी महेमूद , सचिन बेंबडे , मुक्तार शेख ,   योगेश्वरी पतसंस्थेचे संचालक सय्यद अमजद आदीजन उपस्थित होते .

        यावेळी  कार्यक्रम प्रसंगी सुरुवातीस योगेश्वरी देवी आणि सिस्टर फ्लॉरेन्स नाइटीजेल्स यांच्या प्रतिमांचे  पुजन करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की कोरोना काळात नातेवाईक रुग्णाच्या जवळ येत नसताना  डॉक्टर , नर्स , आणी आरोग्य कर्मचारी रुग्णाच्या आरोग्य सेवेला धावपळ करत होते . तेव्हा अशा माणसाच्या कार्याची दखल घेणे आम्ही आमचे कर्तव्य समजून त्यांच्या कार्याची  उतराई होण्यासाठी कुठेतरी अंबाजोगाई पिपल्स बँक छोटासा प्रयत्न करत असल्याचे राजकिशोर मोदी यांनी सांगितले . अंबाजोगाई पिपल्स बँक केवळ अर्थकारणच करत नसून विविध प्रकारच्या सामाजिक  उपक्रमाचे आयोजन वेळोवेळी करत असते . बँकेने यापूर्वीही शिक्षक , अंगणवाडी सेविका , आंगणवाडी शिक्षिका , नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी , पोलीस कर्मचारी यांचा कोविड योध्दा म्हणून सत्कार केला असल्याचे सांगितले . तसेच कोरोना काळात रुग्णांसाठी महारक्तदान शिबिराचे आयोजन करून जवळपास १२०० बॅग रक्तसंकलन करण्यात येऊन नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी मदत केली होती.  आपण यापुढेही असेच सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबवीत राहू  असे आश्वासन देखील मोदी यांनी दिले .

            या कार्यक्रम प्रसंगी स्वा रा ती चे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले  त्यांनी अंबाजोगाई पिपल्स बँक , राजकिशोर मोदी आणि त्यांचे सहकारी आयोजित करत असलेल्या अश्या सामाजिक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करतांना त्यांचे कौतुक केले .

         आपल्या अध्यक्षीय समारोपात विधान परिषद सदस्य आमदार संजय दौंड यांनी राजकिशोर मोदी हे कोरोना काळात निस्वार्थीपणे काम करणाऱ्या लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे कार्य करत असल्याचे गौरवोद्गार काढले . आज लोक कोरोना संपला म्हणून अनेक मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत . अश्या कार्यक्रमात कोणीच मास्कचा तसेच सॅनिटायजरचा वापर करतांना दिसून येत नाही . तेव्हा नागरिकांनी असे न करता त्रिसूत्री चा वापर करावा असे आवाहन आमदार संजय दौंड यांनी केले .नुकताच येऊ घातलेल्या ओमीक्रोन व्हायरस ने पुन्हां डोके वर काढले असून त्याबाबत नागरिकांनी खबरदारी बाळगावी असेही आवाहन दौंड यांनी केले . तसेच  स्वा रा ती रुग्णालयास राज्याचे  आरोग्यमंत्री ना राजेश टोपे , जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे देखील आभार व्यक्त केले .या सत्कार समारंभ सोहळ्यात आपल्या जीवाची पर्वा न करता , स्वतः कोरोना बाधित होऊन रुग्णाच्या सेवेसाठी आहारात झटणाऱ्या डॉ विशाल लेंडे यांचा विशेष  सत्कार व सन्मान करण्यात आला .

        स्वा रा ती रुग्णालयातील कोरोना योध्दा सत्कार समारंभ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुनील व्यवहारे , राणा चव्हाण , हकीम लाला ,अमजद सय्यद, अन्वर पठाण ,  वेदपठाक महेश  , दिनेश घोडके ,  पिपल्स बँकेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन कांबळे सर यांनी तर आभार शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांनी मानले .

Wednesday 1st of December 2021 07:06 PM

Advertisement

Advertisement