जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याबाबत जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक संपन्न
बीड दि. 19 (जि.मा.का.): शेतकरी आत्महत्या बाबत जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याबाबत जिल्हास्तरीय समितीच्या बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला त्वरित लाभ मिळवून देण्यासाठी संबधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्याच्या सूचना श्री. जगताप यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीस पोलीस अधीक्षक आर.राजा, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, जिल्हा उपनिंबधक स.सं. गोपाळकृष्ण परदेशी, कृषी विभागाचे आर.एस.मंत्री, पोलीस निरिक्षक पेरगुलवार, आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे प्रतिनिधी जीवनराव बजगुडे उपस्थित होते.
बीड जिल्हयातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांचा एकूण 13 प्रकरणाचा आढावा जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी घेतला त्यामधील 10 प्रकरणे जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरविली असून 3 प्रकरणे फेरतपासणीसाठी तालुकास्तरीय समितीकडे पाठविण्यात आली आहेत.
