Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

कुंबेफळ येथे शेतमजुरांना कीटकनाशक फवारणी कौशल्य विकास प्रशिक्षण

कृषी विभागाच्या पोकरा प्रकल्पांंतर्गत उपक्रम

 अंबाजोगाई - शेतकऱ्यांना हवामान अनुकूल तंत्रज्ञानाची सखोल माहिती व्हावी या उद्देशाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) च्या माध्यमातून सहभागी गावांमध्ये खरीप व रब्बी हंगामात मुख्य पिकांच्या शेतीशाळा घेण्याचे नियोजन केले गेले  होते. शेतीशाळांच्या दोन्ही हंगामातील नियोजनानुसार खरिपातील शेतीशाळा सद्यःस्थितीत सुरू आहेत. या शेती शाळांमध्येच शेतमजुरांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याबाबत कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून सध्या शेतकरी पीकावर कीटकनाशकांची फवारणी करीत असल्याने फवारणी करताना विषबाधा होण्याची शक्यता असते त्यामुळे अनेकांचा जीव गेल्याच्या घटना ही झाल्या आहेत. अशा दुर्घटना होऊ नयेत याकरिता शेतमजुरांचे फवारणीचे कौशल्य वाढवण्यासाठी आत्मा विभागाचे प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे, अंबाजोगाई उपविभागीय कृषी अधिकारी व्ही एम मिसाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई उपविभागांंतर्गत केज, परळी, अंबाजोगाई तालुक्यातील एकशे तीन गावांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षणाचा कार्यक्रम आखला आहे, त्यानुसार अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे पोकरा योजनेअंतर्गत शेतीशाळा घेऊन उपस्थित शेतमजुरांना किटकनाशकांची सुरक्षित फवारणी, हाताळणी व वापर या संदर्भात शेतीशाळा समन्वयक शिवप्रसाद येळकर व शेतीशाळा प्रशिक्षक दशरथ उबाळे यांनी शेतामध्ये प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच फवारणीच्या वेळी चुकून विषबाधा झाली तर काय काळजी घ्यायची यासंदर्भात प्रशिक्षणात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये मंडळ कृषी अधिकारी श्री बर्वे आर डी यांनी सोयाबीन पिकाची सध्याची परिस्थिती, पिकावरील कीड रोग नियंत्रण तसेच समूह सहाय्यक सुशांत धावरे यांनी पोकरा डीबीटी अप्लिकेशनचा वापर करून योजनांचा लाभ घेण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला मंडळकृषी अधिकारी श्री बर्वे आर डी, कृषी पर्यवेक्षक श्री कापसे बी बी, कृषी सहाय्यक किशोर आडागळे, श्री ए ए गाडे, श्री मागाडे डी एस, श्री गोविंदराव जाधव, बळीराम सोनवणे, सूर्यकांत कसबे, विजयकुमार इंगोले, शेख इब्राहिम, दगडू शिंदे, संकेत गायकवाड, लुगडे शिवाजी आदी शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday 4th of August 2020 06:57 PM

Advertisement

Advertisement