अंबाजोगाई, गेवराईतील कंटेनमेंट झोन घोषित
अंबाजोगाई/गेवराई : गुरुवारी अंबाजोगाई शहरात दोन तर गेवराई तालुक्यात एक कोरोना बाधित आढळून आला. त्यामुळे कोरोनाचा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी या बाधितांच्या संपर्कातील भागात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे.
अंबाजोगाई शहरातील देशपांडे गल्लीतील ५० वर्षीय पुरुष पाॅझिटीव्ह आला. हा व्यक्ती फिरता कापूस व्यावसायिक असल्याचे समजते. त्यामुळे देशपांडे गल्लीतील मोहन वासुदेव देशपांडे यांचे घर ते अनिल शेषेराव देशपांडे यांच्या घराच्या परिसरात कंटेनमेंट झोन घोषित आला असून अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर, गेवराई तालुक्यातील उमापूर येथील ३४ वर्षीय पुरुष पाॅझिटीव्ह आला. त्यामुळे उमापूर गावात कंटेनमेंट झोन घोषित आला असून अनिश्चित कालावधीसाठी बंद करून संचारबंदी लागू करण्यात आली.