Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

विद्युत तारेला चिटकुन तरुण जागीच ठार

वडवणी -   घरावरील लोंबकळलेल्या  विद्युत तारेला चिटकुन एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून ही घटना ताडसोन्ना तालुका बीड येथे आज रत्री आठ  वाजता घडली आहे.लोंबकळलेल्या विद्युत तारेबद्दल येथील कर्मचा-यांना वारंवार सांगुनही त्या तारा दुरुस्त केल्या नाहीत.

       विद्युत मंडळाच्या हलगर्जीपणामुळे सुनिल गोरख धरबुडे वय२५  वर्ष या  तरुण युवकाचा अंत झाला आहे.विद्युत मंडळाला सतत या गोष्टी सांगूनही  याची दखल घेतली गेली नाही.आणि या तरुण युवकाला आपले प्राण गमवावे लागले.विद्युत मंडळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या तरुणाचा करुण अंत झाला आहे.सुनिल धरबुडे हा अल्पभुधारक शेतकरी असुन लोकांच्या शेतात मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.त्याच्या पश्चात आई-वडील,पत्नी एक मुलगा असा परिवार आहे.विद्युत कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन संबधीत तरुणाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी मागणी केली आहे.

Thursday 9th of July 2020 08:36 PM

Advertisement

Advertisement