Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

अंबाजोगाईकरांची धाकधूक वाढली; आणखी तिघे पाॅझिटीव्ह

अंबाजोगाई : लॉकडाऊनच्या साडेतीन महिन्यानंतर अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. यात मंगळवारी आणखी तीन रुग्णांची भर पडली. पुणे येथून परतलेला शहरातील सातपुते गल्ली भागात राहणारा ३० वर्षीय तरुण, अलिबागहून आलेला सिराज कॉलनीतील ३८ वर्षीय पुरुष आणि किर्गीस्तान येथून आलेला केकाणवाडीचा २२ युवक या तिघांचे अहवाल मंगळवारी पाॅझिटीव्ह आले. 

             यापूर्वी तालुक्यातून चार कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुण अंबाजोगाईतील आनंद नगर भागात राहणाऱ्या भावाकडे आल्यानंतर तो पाॅझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. उपचार सुरु असताना या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असल्याचे उघड झाले होते. परंतु, तिच्या इच्छेनुसार तिला उपचारासाठी उस्मानाबादला हलविण्यात आले. तसेच, तालुक्यातील बागझरी येथील महिलेला देखील कोरोनाची लागण झाली. त्यानंतर अलिबागहून आलेली कबीर नगर मधील महिला पाॅझिटीव्ह आली. मंगळवारी सिराज कॉलनीतील पाॅझिटीव्ह आलेला व्यक्ती याच महिलेचा जवळचा नातेवाईक आहे. सध्या एकूण पाच रुग्णांवर अंबाजोगाईत उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस अंबाजोगाईतील रुग्णसंख्या वाढू लागल्याने नागरिकात चिंतेचे वातावरण आहे. 

 

विवेक सिंधु न्यूज

WhatsApp - 9764033111

Tuesday 7th of July 2020 11:49 PM

Advertisement

Advertisement