Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

शंभर रुपयांसाठी भावाचा काटा काढला; तीन दिवसांची पोलीस कोठडी

माजलगांव : तालुक्यातील पिंपळगाव (नाखली) येथे खिशातील १०० रुपये घेतल्याच्या कारणाने लक्ष्मण दशरथ काळे याचा सख्या भावाचा खुन केल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती . दिंद्रुड ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपी गजानन दशरथ काळे यास अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली .

        दिंद्रुड पोलिस हद्दीतील नाखले पिंपळगाव येथिल गजानन दशरथ काळे व लक्ष्मण दशरथ काळे हि दोन भावंडे राहत होती. उसतोड मजुरी वर उपजिवीका भागवणारे दोन्ही भाऊ दारु पिऊन सतत एकमेकांशी वाद घालायची. वाद नेहमीच होत असल्याने गावातील सहसा कुणी या कुटुंबाकडे लक्ष देत नव्हते. शनिवारी रात्री १० ते ११ च्या दरम्यान लक्ष्मण या लहान भावाने मोठा भाऊ गजानन याच्या खिशातील १०० रुपये चोरल्याच्या कारणावरुन दोघा भावांत तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीत डोक्याला गंभीर जखम झाल्याने लक्ष्मण दशरथ काळे (वय २८) याचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत आरोपी गजानन यास बेड्या ठोकल्या. चौकशीत गजाननने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सोमवारी त्याला माजलगांव न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती दिंद्रुड पोलिस स्टेशन चे सपोनि अनिल गव्हाणकर यांनी दिली आहे.


विवेक सिंधु न्यूज WhatsApp - 9764033111

Monday 1st of June 2020 11:38 PM

Advertisement

Advertisement