Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

भारतीय संस्कृतीतून मिळते मानवजातीला प्रेरणा-श्रीकांत काशीकर

दीनदयाळ बँकेची युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला

अंबाजोगाई : अंबाजोगाई (प्रतिनिधी) पुर्वीच्या काळी गुरुकुलातून समानता शिकवली जात असे,भारताकडे मातृशक्तीचा मोठा इतिहास आहे.सत्कर्मामुळे व ठाम निर्णय घेतल्याने कधीही नुकसान होत नाही.अहंकार बाजूला झाल्या शिवाय जनकल्याण होवु शकत नाही.केवळ कायदे केल्यानेच समाजात कधीही सुधारणा होत नाही.तर त्यासाठी कायद्याचे पालन होणे गरजेचे आहे.प्रथम स्वता:चे घर आदर्श बनवा. समाज आपोआप आदर्श बनेल.

राम-कृष्ण चरिञ अभ्यासा व तसे आचरण करा.कारण, भारतीय संस्कृतीतून कायमच मानवजातीला प्रेरणा मिळते. रामायण-महाभारतात जगातील सर्व प्रश्नांची उत्तर मिळतात असे प्रतिपादन श्रीकांत काशीकर (औरंगाबाद) यांनी केले.ते दीनदयाळ बँकेतर्फे आयोजित युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेतील द्वितीय पुष्प गुंफताना बोलत होते.

ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्था बळकट करून “विश्वास,विकास आणि विनम्रता" या त्रिसुत्रीने आर्थिक क्षेत्रात दमदार कार्य करणा-या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2020 या कालावधीत युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या 157 व्या आणि स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन केले आहे.शनिवार दि.11 जानेवारी रोजी प्रा.श्रीकांत पु.काशीकर (औरंगाबाद) यांचे “रामायण-महाभारतातील आदर्श" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या “भरतमुनी रंगमंच" या व्यासपीठावर बँकेच्या अध्यक्षा सौ.शरयुताई शरदराव हेबाळकर,बँकेचे उपाध्यक्ष विजयकुमार कोपले,सहकार भारतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा.आबासाहेब देशपांडे (परभणी),बँकेचे संचालक डॉ.दि.ज.दंडे, संचालक गौतमचंद सोळंकी,अॅड.राजेश्वर देशमुख,बिपीनदादा क्षीरसागर, जयवंतराव इटकुरकर,गोविंदराव कुडके आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी सहकार भारतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा.देशपांडे यांनी 11 जानेवारी या सहकार भारतीच्या स्थापना दिवसानिमित्त सहकार भारतीचे प्रणेते लक्ष्मणराव (तात्या) इनामदार यांचा कार्य परिचय करून उपस्थितांना सहकार भारतीचे कार्य,ओळख आणि महत्व सांगितले.श्रीकांत काशीकर (औरंगाबाद) यांच्या "रामायण महाभारतातील आदर्श" या विषयावरील व्याख्यानाने रसिक,श्रोते यांना भक्ती रसाची शिदोरी मिळाली. प्रारंभी मान्यवरांनी दीपप्रज्ज्वलन तथा भारतमाता, पंडीत दीनदयाळजी उपाध्याय, स्वामी विवेकानंद व लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतिमांचे पुजन केले.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय संचालक गोविंदराव कुडके यांनी करून दिला. बँकेच्या वतीने सर्व प्रमुख पाहुण्यांचे बँकेच्या अध्यक्षा व उपाध्यक्ष यांनी स्वागत केले. जयेंद्र कुलकर्णी यांनी वैयक्तिक पद्य सादर केले.सुञसंचालन बँकेचे संचालक बिपीनदादा क्षीरसागर यांनी करून उपस्थितांचे आभार बँकेचे संचालक जयवंतराव इटकुरकर यांनी मानले.यावेळी बँकेच्या अध्यक्षा सौ.शरयुताई शरदराव हेबाळकर,उपाध्यक्ष विजयकुमार कोपले,संचालक डॉ.दि.ज.दंडे, गौतमचंद सोळंकी,पुरूषोत्तम भुतडा,चैनसुख जाजु,राजाभाऊ दहिवाळ,गोविंद कुडके,अ‍ॅड. राजेश्वर देशमुख,बिपीन क्षिरसागर,अ‍ॅड.मकरंद पत्की, प्राचार्य किसन पवार,जयवंतराव इटकुरकर (कुलकर्णी),तज्ञ संचालक भीमा ताम्हाणे(सनदी लेखापाल),तज्ञ संचालक अ‍ॅड.अशोक कुलकर्णी व मुख्यकार्यकारी आधिकारी सनतकुमार बनवसकर, अंबाजोगाई शहर व परिसरातील बँकेचे सभासद,ग्राहक,ठेवीदार, हितचिंतक व विविध क्षेञातील मान्यवर,बंधू-भगिणींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दीनदयाळ बँकेचे सर्व अधिकारी,कर्मचारीवृंद यांनी परीश्रम घेतले.

Monday 13th of January 2020 05:00 PM

Advertisement

Advertisement