Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

पु.ल.देशपांडे यांचे साहीत्य मराठी मनांवर संस्कार करणारे-अभय देवरे

दीनदयाळ बँकेची युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला

अंबाजोगाई : अंबाजोगाई - आजची पिढी ही मोबाईलच्या जगात हरवली आहे.नव्या पिढीने पु.ल.देशपांडे यांचे साहीत्य वाचले पाहिजे.पुर्वी प्रत्येक घरात वृध्द आजी हिच डॉक्टर होती. कारण,आजीबाईचा बटवा हा औषधी जडीबुटींनी भरलेला असायचा.आजच्या धावपळीच्या व मानसिक ताण-तनावाच्या काळात पु.ल.देशपांडे यांचे साहीत्य हा ही एक बटवाच आहे.पु.लंच्या विनोदाने मराठी साहित्य समृद्ध व श्रीमंत झाले. कारण,पु.लंनी कधीच कमरेखालचे विनोद केले नाहीत.जोपर्यंत मराठी भाषा जिवंत आहे तोपर्यंत पु.लंचे साहीत्य हे जिवंत राहील असे प्रतिपादन अभय देवरे (सातारा) यांनी केले.ते दीनदयाळ बँकेतर्फे आयोजित युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेतील प्रथमपुष्प गुंफताना बोलत होते.

ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्था बळकट करून “विश्वास,विकास आणि विनम्रता" या त्रिसुत्रीने आर्थिक क्षेत्रात दमदार कार्य करणा-या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2020 या कालावधीत युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या 157 व्या आणि स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन केले आहे.शुक्रवार,दि.10 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता अभय देवरे व वनराज कुमकर (सातारा) यांचेे "पु.लं.चा बटवा" या विषयावर सुश्राव्य,नर्म विनोदी,बहारदार नाट्य सादरीकरण झाले.यावेळी खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या “भरतमुनी रंगमंच" या व्यासपीठावर बँकेच्या अध्यक्षा सौ.शरयुताई शरदराव हेबाळकर,बँकेचे उपाध्यक्ष विजयकुमार कोपले,बँकेचे संचालक डॉ.दि.ज.दंडे,संचालक गौतमचंद सोळंकी,बिपीनदादा क्षीरसागर,जयवंत इटकुरकर (कुलकर्णी),गोविंद कुडके,अॅड. अशोकराव कुलकर्णी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी प्रास्ताविक करताना बँकेच्या अध्यक्षा सौ.शरयुताई शरदराव हेबाळकर यांनी सांगितले की,आर्थिक क्षेत्रात काम करताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून समाजाचे आपण काही देणे लागतो.या जाणिवेने अंबाजोगाईकरांना गेल्या 17 वर्षांपासून व्याख्यानमालेच्या माध्यमातून वैचारिक मेजवानी देण्याचे काम दीनदयाळ नागरी सहकारी बँक अव्याहतपणे करीत आहे. या अनोख्या उपक्रमाचे हे 18 वे वर्ष आहे. विविध क्षेञातील राज्यातील व राज्याबाहेरील तज्ञ व नामवंत व्यक्तींनी या व्याख्यानमालेत वेळोवेळी आपले अनमोल विचार मांडलेले आहेत.काळासोबत वाटचाल करताना ग्राहक हिताकरीता नवनवे बदल,तंञज्ञान स्विकारून दर्जेदार बँकिंग सेवा व सुविधा पुरविण्याचे काम बँक करते.यापुढे ग्राहकांचा वेळ वाचावा, तात्काळ बँकिंग सेवा उपलब्ध व्हावी,याकरीता डिजिटल इंडिया सारखे डिजिटल बँक हे स्वप्न साकार करूयात. आरबीआयच्या नियमांनुसारच बँक काम करते.कर्जदार, ठेवीदार व हितचिंतक यांनी या नव्या सुविधेचा लाभ घ्यावा.बँकेविषयी सहकार्याची भावना ठेवावी.वेळोवेळी आपल्या मौलिक सुचना कराव्यात बँकेच्या उत्कर्षासाठी सहभाग घ्यावा.कारण,आपल्या प्रतिसादावरच बँकेचे यश हे अवलंबून आहे असे सांगून बँकेच्या अध्यक्षा सौ.शरयुताई शरदराव हेबाळकर यांनी बँकेच्या सर्वांगीण प्रगतीचा अहवाल उपस्थितांसमोर ठेवला.

.तर यावेळी अभय देवरे व वनराज कुमकर (सातारा) यांनी "पु.लं.चा बटवा" या विषयावर पु.लं.च्या लेखनाची व स्वभावाची अनेक वैशिष्ट्ये सांगितली.पु.ल.हे दानशुर व अंतर्बाह्य निर्मळ होते.असे सांगून त्यांनी बबडू,अंतू बर्वा,गोपाळराव या व्यक्तीरेखा नाट्य सादरीकरण व प्रभावी निवेदनाद्वारे सादर केल्या. बहारदार सादरीकरणाने रसिक, श्रोते काही काळ हास्यकल्लोळात बुडाले तर काही काळ ते अंत:र्मुख ही झाले.संपुर्ण कार्यक्रमात रसिक,श्रोते हे मंञमुग्ध झाले होते.प्रारंभी मान्यवरांनी दीपप्रज्ज्वलन तथा भारतमाता, पंडीत दीनदयाळजी उपाध्याय आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पुजन केले.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय संचालक बिपीन क्षीरसागर यांनी करून दिला.बँकेच्या वतीने सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पहार,पुष्पगुच्छ व शाल देवून बँकेच्या अध्यक्षा व उपाध्यक्ष यांनी स्वागत केले. जयेंद्र कुलकर्णी यांनी वैयक्तिक पद्द सादर केले.सुञसंचालन करून बँकेचे संचालक जयवंत इटकुरकर (कुलकर्णी) यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावर्षी युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या 157 व्या जयंतीनिमित्त 10 ते 12 जानेवारी 2020 दरम्यान आयोजित व्याख्यानमालेसाठी दि.11 जानेवारी,शनिवार रोजी सायंकाळी 6.30 वाजता प्रा.श्रीकांत पु.काशीकर (औरंगाबाद) यांचे “रामायण- महाभारतातील आदर्श" या विषयावर प्रवचन होईल.व्याख्यानमालेचा समारोप दि.12 जानेवारी,रविवार रोजी सायंकाळी 6.30 वाजता कॅप्टन स्मिता गायकवाड (मंबई) यांच्या “शहरी नक्षलवाद" या व्याख्यानाने होईल.युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला-2020 चे आयोजन शहरातील खोलेश्वर माध्यमिक विद्यालय,कुत्तरविहीर,अंबाजोेगाई (जि. बीड) येथे करण्यात आले आहे.उर्वरीत दोन दिवस ही व्याख्यान व प्रबोधनपर कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहर व परिसरातील रसिक,श्रोते, नागरिक,माता,भगिनी आणि युवक वर्गाने उपस्थित रहावे असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी बँकेच्या अध्यक्षा सौ.शरयुताई शरदराव हेबाळकर,उपाध्यक्ष विजयकुमार कोपले,संचालक डॉ.दि.ज.दंडे, गौतमचंद सोळंकी,पुरूषोत्तम भुतडा,चैनसुख जाजु,राजाभाऊ दहिवाळ,गोविंद कुडके,अ‍ॅड. राजेश्वर देशमुख,बिपीन क्षिरसागर,अ‍ॅड.मकरंद पत्की,प्राचार्य किसन पवार,जयवंत इटकुरकर (कुलकर्णी),तज्ञ संचालक भीमा ताम्हाणे(सनदी लेखापाल),तज्ञ संचालक अ‍ॅड.अशोक कुलकर्णी व मुख्यकार्यकारी आधिकारी सनतकुमार बनवसकर,अंबाजोगाई शहर व परिसरातील बँकेचे सभासद,ग्राहक,ठेवीदार,हितचिंतक व विविध क्षेञातील मान्यवर,बंधू-भगिणींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दीनदयाळ बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारीवृंद यांनी परीश्रम घेतले.

Saturday 11th of January 2020 03:45 PM

Advertisement

Advertisement