Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

रविवार दि. 12 जानेवारी रोजी अंबाजोगाईत लिव्हरचे (यकृत) आजार निदान व उपचार शिबीराचे आयेाजन

अंबाजोगाई : अंबाजोगाई - येथील क्षारपाणी आयुर्वेद व आयुर्ग्राम फाऊंडेशन यांच्या वतीने मराठवाड्यात प्रथमच अंबाजोगाईत रविवार दि. 12 जानेवारी रोजी लिव्हरचे (यकृत) आजार निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डॉ.उदय खरे (पुणे) हे सुप्रसिद्ध आयुर्वेद लिव्हर तज्ञ शिबीरातील सहभागी रूग्णांच्या आजाराचे निदान करून योग्य उपचार करणार आहेत. रूग्ण तपासणी व सल्ला मोफत राहिल तरी गरजूंनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक डॉ.डी.बी.चामनर यांनी केले आहे.

सदर शिबीरासाठी येताना पुर्वीचे सर्व रिपोर्ट सोबत आणणे गरजेचे आहे. रूग्ण तपासणी व सल्ला मोफत असून औषधे विकत घ्यावी लागतील. गरज पडल्यास लघवी, शौच, सोनोग्राफी आदी तपासण्या स्वखर्चाने कराव्या लागतील, सर्वांसाठी संवुर्ण लिव्हर शुद्धी सुविधा उपलब्ध आहे. मराठवाड्यात हे शिबीर प्रथमच अंबाजोगाई येथे रविवार दि. 12 जानेवारी रोजी क्षारपाणी आयुर्वेद चिकित्सालय, योगेश्‍वरी  नुतन विद्यालयाच्या बाजूला प्रशांत नगर याा ठिकाणी होत आहे. शिबीरासाठी येताना गरजू रूग्णांनी पुर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. या शिबीरात कावीळ (पांढरी-पिवळी), लिव्हर सिर्‍हॉसीस, हिपॅटायटीस बी. व सी. लिव्हर कॅन्सर, फॅटी कॅन्सर, जलोदर (असायटीस) आदींच्या तपासण्या रूग्णांना सुप्रसिद्ध आयुर्वेद लिव्हर तज्ञ डॉ.उदय खरे (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली करून घेतला येईल. तरी गरजूंनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक डॉ.डी.बी.चामनर यांनी केले आहे.

Friday 10th of January 2020 04:45 PM

Advertisement

Advertisement