Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

आधार लिंक प्रकरणी शासनाकडून बँकांना सुचना प्राप्त

गावोगाव कॅम्प घेण्याची मागणी

अंबाजोगाई : अंबाजोगाई - अनेक शेतकर्‍यांचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक नाहीत कर्ज माफीसाठी आधार लिंक असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांनी बँकेत जाण्यास सुरूवात केली आहे. या ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याने आधार कार्ड लिंक करण्यासाठी कॅम्प घेण्याची मागणी शेतकर्‍यांकडून  होत आहे.

राज्य सरकारने जाहिर केलेल्या महात्मा ज्योतीबाराव फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकर्‍यांना त्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. खाते व आधार लिंक नसल्यास कर्जमाफी मिळण्यात आडचणी येवू शकतात. त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आधारलिंक करावे लागणार आहे. राज्य शासनाने नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात शेतकर्‍यांना 2 लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे.

कर्जमाफी संदर्भात शेतकर्‍यांना  लाभ कसा देता येईल या बाबत शासनाने आदेश ही निर्गमित केले आहेत. त्या दृष्टीने पात्र शेतकरी निश्‍चित करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रशासन स्तरावर व बँकांना सुचना प्राप्त झाल्या आहेत असे असले तरी अद्याप शेतकर्‍यांची संख्या नेमकी किती राहिल या बाबत सभ्रम आहे.  बँकांना प्राप्त शेतकर्‍यांच्या याद्या तयार करावयाच्या आहेत. जे शेतकरी महात्मा ज्योतीबाराव फुले शेतकरी कर्जमाफी  योजनेत पात्र ठरतील असा शेतकर्‍यांचे आधार बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे. या शेतकर्‍यांचे आधार बँकेशी लिंक

नसेल अशा शेतकर्‍यांनी तात्काळ ही कार्यवाही करावी लागणार आहे. शेतकर्‍यांना कार्ड जोडणी सुलभ व्हावी यासाठी गावस्तरावर येणार्‍या काळात मेळावे होण्याची शक्यता आहे. पात्र शेतकर्‍यांची यादी तयार झाल्यानंतर जावडी वाचन कार्यक्रमाच्या माध्यमातून नावे समजू शकणार आहेत. आधार लिंक असलेल्या सर्व शेतकर्‍यांच्या अद्यायावत याद्या सर्व बँकांना तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती अंबाजोगाई येथील महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक  श्रीधर शास्त्र यांनी दिली. कर्जमाफीसाठी येणार्‍या अडचणी व त्यादुर करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश शासन पातळीवरून प्रशासन व बँकांना देण्यात आल्याने प्रशासन व बँक स्तरावर कर्जमाफीसाठीची कार्यवाही सुरू झाली आहे.

Friday 10th of January 2020 03:45 PM

Advertisement

Advertisement