Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

प्रसिद्ध व्यापारी गणेश उमनवार यांचे निधन

अंबाजोगाई : अंबाजोगाई - शहरातील फटाके व ड्राय फ्रुट चे प्रसिद्ध व्यापारी गणेश संभाजी उमनवार यांचे रात्री निधन झाले.

गणेश संभाजी उमनवार हे गेली महिनाभरापासून -हदयाच्या आजाराने आजारी होते. पंधरादिवसापुर्वीच पुणे येथील एका नामांकित खाजगी रुग्णालयात त्यांच्या -हदयावर शस्त्रक्रिया करुन वाँल बसवण्यात आला होता. शस्त्रक्रिया होवून प्रकृती स्थीर झाल्यानंतर ते विश्रांती साठी अंबाजोगाई येथे आपल्या घरी आले होते. दोन दिवसापासून त्यांचा बीपी अचानक कमी होवू लागल्यामुळे त्यांना लातुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करुन त्यांना पुन्हा पुणे येथे हलवण्यात येत असतांनाच काल मध्यरात्री त्याचे निधन झाले. गणेश उमनवार यांना लहानपणापासूनच सतत उत्साही आणि सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गणेश उमनवार यांना पत्नी, बालाजी आणि गोविंद ही दोन मुले, सुना नातवंडे आदि मोठा परीवार आहे.

Friday 29th of November 2019 04:15 PM

Advertisement

Advertisement