Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

संविधान समजून घेणे काळाची गरज - प्रभारी सोनवळकर

अंबाजोगाई : अंबाजोगाई (प्रतिनिधी)- संविधानामुळेच आपणास आपल्या अधिकार व कर्तव्याची जाणीव होते. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपले संविधान वाचून नीट समजून घेतले पाहिजे ती काळाची गरज आहे. असे प्रतिपादन प्रभारी प्राचार्य रमेश सोनवळकर (स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोगाई) यांनी केले. खोलेश्‍वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन विस्तार सेवा व राज्यशास्त्र लोकप्रशासन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. पी.पी.टी.द्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी मंचावर प्रभारी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, डॉ.दीपक फुलारी, डॉ.तात्यापुरी, प्रा.अंकुश, प्रा.डॉ. वाकळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरूवात डॉ.बाबासाहेब आंबेबडकर व संविधानाच्या प्रतिमापूजनाने झाली.

अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ.कमलाकर कांबळे म्हणाले की, संविधान हे अत्यंत अभ्यासपुर्ण लिहिलेले असून ते आपणास दिशादर्शक आहे. या संविधानामुळेच आपली लोकशाही समर्थपणे टिकून आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.तात्यापुरी यांनी केले आणि कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतिक्षा भगत या विद्यार्थीनींने केले. तर संविधान उद्देशिकेचे वाचन शिवानी आंबेकर हीने केले. तर आभार प्रा.डी.जे. चव्हाण यांनी मानले कार्यक्रमानंतर लगेचच संविधानावर आधारित स्पर्धा परिक्षा घेण्यात आली. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.देवर्षी, डॉ.बी.व्ही. मुंडे, प्रा.गायकवाड, प्रा.कावळे, प्रा.डॉ.यु.जे.कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

Thursday 28th of November 2019 04:00 PM

Advertisement

Advertisement