Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

दुचाकीच्या अपघातात एक गंभीर

महामार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमीला मिळाले तत्काळ उपचार

बीड : बीड पाडळसिंगी येतून दुचाकी क्र.( Mh 23 aq 8373) वरून गावी जात असताना समोरून आलेल्या दुचाकीने जोराची धडक दिल्याने सुखदेव दादाराव यादव (वय 50 वर्ष रा. बऱ्हाणपूर ता. गेवराई) हे गंभीर जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस कर्मचारी सागर शेळके व जाधव यांनी आयआरबी ची रुग्णवाहिका घेऊन जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. महामार्ग पोलिसांच्या तत्परतेने त्या जखमीला तत्काळ उपचार मिळाल्याने सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. ही घटना आज रात्री 7.45 च्या सुमारास पाडळसिंगीच्या पुढे घडली.

Thursday 7th of November 2019 09:30 PM

Advertisement

Advertisement