Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

न्यु व्हिजन पब्लिक स्कुलच्या विज्ञान व कला प्रदर्शनात 500 विद्यार्थ्यांचा सहभाग

विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांचे मान्यवरांकडून कौतुक

अंबाजोगाई : अंबाजोगाई - थोर शास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान व कला प्रदर्शनाचे न्यू व्हिजन पब्लिक स्कुल मध्ये दि.07 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले.यात 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.विद्यार्थ्यांनी तयार केलेली विविध उपकरणे पाहुन मान्यवर व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

न्यू व्हिजन पब्लिक स्कुलमध्ये दरवर्षी विज्ञान व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.यावर्षी हे प्रदर्शन गुरुवार, दि.7 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते.या भव्य विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन योगेश्‍वरी महाविद्यालयाचे प्राचार्य यु.डी.जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रदर्शनाला संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी,डॉ.डी.एच.थोरात, प्रा.वसंतराव चव्हाण,शाळेचे प्राचार्य रोशन नायर,डॉ.संदीप थोरात,डॉ.निलेश तोष्णिवाल, डॉ.गणेश तोंडगे,डॉ.संदीप मोरे, डॉ.विनोद जोशी यांचेसहीत मान्यवरांची उपस्थिती होती.या प्रदर्शनास अंबाजोगाई शहर व तालुक्यातील विविध शाळा, त्यांचे विद्यार्थी,शिक्षक,पालक मान्यवरांनी भेट दिली.या प्रदर्शनात सुमारे 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर अनेकांनी प्रत्यक्ष भेट देवून माहीती घेतली,पाहणी केली.सहभाग घेतला.या कला व विज्ञान प्रदर्शनात विविध विषयातील अनेक प्रतिकृती,थ्री डी शो,चार्ट,प्रयोग,लँग्वेज लॅब व त्या संदर्भातील वैज्ञानिक, भूमितीय,कलेशी निगडीत माहिती,चिञकला,निसर्ग पेंटींग,

कलाकुसर,पर्यावरण,वनस्पती,फळ व फुलांचे प्रकार,पक्षी, पाळीव व जंगली प्राणी,विविध रसायनांचे प्रयोग,नविन तंञज्ञान,अंतराळ शोध, संशोधन,सौर ऊर्जेचा वापर, वाढते प्रदुषण,हवामानातील होणारे बदल,चुंबकशक्तीचे प्रयोग,डिजीटल सिटी, संगणकिय,इंटरनेट,मोबाईल क्रांती,दुरसंचार दळण-वळण, भारतीय शास्ञज्ञांचा जीवन परीचय,भारतीय अवकाश संशोधन व प्रमुख शोध,संगीत, क्रिडा,वैद्यकिय,आभियांञिकी आदी विषयातील माहिती तसेच काही विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक वेशभुषा करून मान्यवरांचे लक्ष वेधले.स्वता: विज्ञान उपकरण तयार करणा-या विद्यार्थ्यांशी संवाद साधून यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणने ऐकून,प्रयोग पाहून,जाणून घेतले व या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवून त्यांचा आनंद द्विगुणित केला. तसेच याप्रसंगी न्यु व्हिजन पब्लिक स्कुल संस्थेचे सचिव अध्यक्ष राजकिशोर मोदी,प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी, मार्गदर्शक प्रा.वसंतराव चव्हाण, प्रशासकीय अधिकारी डॉ.डी. एच.थोरात,कार्यकारी संचालक संकेत मोदी,विनायक मुंजे यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले.यावेळी इयत्ता 10 वर्गातील विद्यार्थ्यांनी परिपाठ सादर केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सानिका व सोनम यांनी केले.तर दानेश्‍वरी हिने बातमीपत्र वाचन केले.झेबा व राजनंदीनी यांनी विज्ञान प्रदर्शनाविषयी माहिती दिली. उपस्थितांचे आभार अल्फिया हिने मानले.विज्ञान विषयाबरोबरच गणित, सामाजिक शास्त्र,मराठी,हिंदी, संस्कृत,संगीत व कला या सर्व विषयांचा समावेश विज्ञान प्रदर्शनात होता.गुरूवार,दि.7 नोव्हेंबर रोजी आयोजित हे प्रदर्शन सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत सर्वांसाठी खुले होते. या शाळेच्या विज्ञान प्रदर्शनासाठी मुख्याध्यापक प्राचार्य रोशन नायर व्यवस्थापक शिवकांत बेटगिरी,समन्वयक दत्तराज कुलकर्णी,परमप्रिया गायकवाड, विज्ञानप्रदर्शन प्रमुख पवन कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सर्व शिक्षकांचे सहकार्य यामुळे विज्ञान व कला प्रदर्शन यशस्विरित्या संपन्न झाले.

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य ==================== मुंबई,पुणे,नागपुर व औरंगाबाद या महानगरांच्या धर्तीवर अंबाजोगाईत इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण (क्वॉलिटी एज्युकेशन) देण्याचे कार्य न्यु व्हिजन पब्लिक स्कुल करते.हि शाळा विद्यार्थ्यांच्या संपुर्ण व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य देते.याकरीता वर्षभर विविध उपक्रम राबवितात.दरवर्षी भव्य विज्ञान व कला प्रदर्शन भरविले जाते.यावर्षी थोर शास्त्रज्ञ सी. व्ही.रमण यांच्या जयंतीनिमित्त हे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले यात 500 हुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले. अतिशय सुरेख नियोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी स्वता: विविध प्रयोग,उपकरणे तयार केली.न्यु व्हिजन पब्लिक स्कुलचा प्रत्येक विद्यार्थी हा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा असून तो राष्ट्र उभारणीत योगदान देत असल्याचे समाधान वाटते. -राजकिशोर मोदी, (संस्थाध्यक्ष,श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाजोगाई जि.बीड).

Thursday 7th of November 2019 09:30 PM

Advertisement

Advertisement