Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

यंदा रब्बीची पेरणीही लांबणीवर

अंबाजोगाई : अंबाजोगाई - मागील आठ दिवसापासुन सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.शेत पिकाचीही मोठी दुरावस्था झाली आहे.  दुष्काळी परिस्थित शेतकर्‍यांच्या डोळ्यात येणारे पाणी अति पावसाने कायम राहिली आहेत. परिणामी या पावसामुळे शेतीतील कामांवर विपरीत परिणाम झाला आहे. शेतातील वापसा होण्यास वीस दिवस लागणार असल्याने यंदा रब्बीची पेरणी ही लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जवळगाव परिसरात परतीचा पाऊस झाल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथील शेतकरी पंजाब हारे यांच्या दोन एक्कर झेंडुचे नुकसान झाले आहे. जमिनीवर पडलेली सोयाबीन सडुन गेले आहे. मक्का, पिवळा काढण्यासाठी मजुर कमी पडत आहेत. पावसाचे पाणी शेतामध्ये  साचले आहे. सर्वत्र पाणी खळखळ वाहत असताना दिसत आहे. नदी नाल्यांमध्ये वाहणारे पाणी शेतातून वाहन आहेत. दरम्यान पाऊस उघडीप देत नसल्याने रब्बी पेरणीसाठी शेती तयार करणे ही अवघड आहे. पाऊस उघडल्यानंतरही शेती तयार करण्यासाठी किमान वीस दिवस लागते. रब्बीची लागवड यामुळे उशीरा होण्याची शक्यता आहे. उभ्या सोयाबीन पिकात पाणी साचल्याने शेंगातुन कोंबारे बाहेर आले आहेत. शेतकर्‍यांनी नियोजन करून दिपावली सणासाठी लावलेल्या झेंडु फुलांचा हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे. सुरूवातीपासुन लावणी, पेरणी, खत फवारणी खुरपणीसाठी झालेला खर्च ही निघणे शक्य नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता पावसाने त्रस्त केले आहे. तर पुढे गारपीठीची घास्ती शेतकर्‍यांमध्ये लागुन राहिली आहे.

Wednesday 6th of November 2019 04:30 PM

Advertisement

Advertisement