Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

परतीच्या पावसाने भाजीपाल्याला फटका, दरात लक्षणीय वाढ

अंबाजोगाई : अंबाजोगाई - परतीच्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांबरोबर भाजी पाल्यांचे ही नुकसान झाले आहे. त्यामुळे आठवडी बाजारात भाजीपाल्याच्या दरात दक्षिणीय वाढ झाली आहे. जेवणाला चव आणणारा कांदा 50 रूपये प्रतिकिलो विक्री होत आहे. लसून 200 रूपयांपर्यंत पोहोंचला आहे. लसून आणि कांद्याचा भाव वाढल्या मुळे गृहिणीला फोंडणीला तडका देताना महिलांची दमछाक झाली आहे.

कांद्याचे भाव आणखीन वाढण्याची शक्यता कांदा व्यापारी व्यक्त करत आहेत. सर्वसामान्यपणे कांद्याचा दर पाच ते दहा रूपयांपर्यंत प्रतिकिलो असतो यावेळी मात्र कांद्याने थेट 50 ते 60 रूपयांपर्यंत मजल मारली आहे. ज्या  शेतकर्‍यांनी कांदा साठवणूक केलेला आहे. त्यांची चांदी झाली. त्यामुळे सध्या छोटा पॅकेट बडा धमाका, अशी उपमा कांद्याला दिली जात आहे. मराठवाड्यात पावसाळा उलटून चार महिने झाले. तरीही पावसाचा पत्ता नव्हता अचानक चक्री वादळामुळे आरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला व संपुर्ण राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला. मागच्या आठवड्यात पावसाने कहरच केला. डोळ्यात तेल घालुन वाट पाहणार्‍या मराठवाड्यातील शेतकर्‍यांनी व नागरिकांना परतीच्या पावसाने मोठा दिलासा मिळाला असला तरी या पावसाने पिकांचे व फळ भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अनेक ठिकाणी उभ्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. त्याच प्रमाणे या पावसाचा फटका भाजीपाला शेतीला ही बसला आहे. भाजीपाला जागेवर खराब होत असल्याने सगळ्यात भाजीपाल्याचे दर गगणाला भिडले आहेत. भाववाढीचे कारण भाजीपाला विक्रेत्यांना विचारले असता पावसामुळे खुप नुकसान झाले. बाजारात भाजीपाला मुबलक प्रमाणात  नसल्याने भाजीपाल्यांचे दर वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. गोर-गरीब आणि सर्वसामान्यांना भाजीपाला घेणे अवघड झाले आहेत. बाजारात जावून भाजीपाला आणायचा म्हटलं की जीव धस करतो एरवी पेक्षा निम्माच भाजीपाला ग्राहक खरेदी करत आहे. कांदा आणि लसुन खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. अनेक कुटुंबांमधून कांदा आणि लसुन हद्दपार झाला आहे. फारच गरज असली तर कांदा आणि लसुन खरेदी केला जातो. नवा कांदा येण्यास आणखीन अवधी आहे. कांद्याचे दर आणखीन वाढणार असल्याचा अंदाज कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी व व्यापार्‍यांनी वर्तविला आहे. चार महिन्यापासुन पाऊस नसल्याने भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ झालेली होती. पाऊस पडल्यानंतर हे दर कमी होतील अशी अपेक्षा होती.

उलट दरामध्ये घसरण होण्याऐवजी दर वाढतच चालेले त्यामुळे महागडा भाजीपाला घेण्यापलीकडे दुसरा पर्याय ग्राहकांकडे नव्हता मंगळवारच्या आठवडी बाजारात हे चित्र दिसून आले.

Wednesday 6th of November 2019 04:15 PM

Advertisement

Advertisement