Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

शेतकर्‍यांच्या व्यथा लक्षात कोण घेणार?

अंबाजोगाई : अंबाजोगाई - एकीकड सत्ता स्थापन करण्यासाठी राजकिय पक्षांच्या हालचाली तर दुसरीकडे परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या व्यथा अशी स्थिती सध्या राज्यात आहे. शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतीच्या बांधावर प्रशासन, लोकप्रतिनिधी द्वारा होत असलेली पाहणी लक्षात घेता. शासन पातळीवर शेतकर्‍यांच्या मदतीसाठी तात्काळ हालचाली कराव्यात व शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

परतीच्या पावसाचा फटका संपुर्ण राज्याला बसला आहे. मराठवाड्यात ही या पावसाने कहर केला. अपुर्‍या पावसावर झालेला पेरी शेतकर्‍यांच्या दृष्टीने हिताचे ठरले. त्यातूचन कसे बसे आलेल्या सोयाबीनच्या पिकाला परतीच्या पावसाचा फटका बसला. ज्यांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. त्यांच्या पुढे तर समस्यांचा डोंगर निर्माण झालेला आहे. एकंदरीत परिस्थितीचा विचार करता. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे. पाहणी अभावी तात्काळ देवून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. नवे सरकार सत्तेवर येण्यासाठी दोन ते तीन दिवसचा अवधी आहे.

त्यामुळे सध्या जरी सत्ता स्थापनेच्या हालचाली होत असल्या तरी नवे सरकार त्वरीत सत्तेवर यावे व शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे. परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने जगायचे कसे हा शेतकर्‍यांसमोर मोठा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. व त्याच काळजीने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.  चिंताग्रस्त शेतकर्‍यांना आधाराची गरज असून नविन सरकार तात्काळ सत्तेवर येवून शेतकर्‍यांना मदत व्हावी अशी अपेक्षा शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे.

Tuesday 5th of November 2019 05:30 PM

Advertisement

Advertisement