Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

बौध्द धम्म करूणेचा अथांग महासागर

भंते संघरक्षित महाथेरो यांची धम्मदेसना; बीड येथील बौध्द धम्म परिषदेचा समारोप

बीड : बीड - या विश्वातील बहूतांश देश भारत देशाला तथागत सिध्दार्थ गौतम बुध्दांची जन्मभूमी म्हणून ओळखतात. तथागत गौतम बुध्दांच्या विज्ञानवादी बौध्द धम्माची शिकवन या विश्वात शांतता प्रस्तापीत करणारी आहे. एवढेच नाही तर बौध्द धम्म करूणेचा अथांग महासागर आहे. असल्याचे धम्मविचार भंते के. संघरक्षित महाथेरो यांनी धम्मदेसना देतावेळी व्यक्त केले. बीड शहरात भिक्खु धम्मशील यांचा सातव्या वर्षावासाच्या समापनानिमित्त शुक्रवार (दि.1) नोव्हेंबर रोजी भव्य बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना धम्मदेशना देतावेळी भंते महाथेरो बोलत होते. यावेळी धम्म परिषदेचे मार्गदर्शक भिक्खु डॉ.उपगुप्त महाथेरो, सोहळ्याचे उद्घाटक भिक्खु के. संघरक्षित महाथेरो, अध्यक्षस्थ भिक्खु धम्मसेवक महाथेरो, भिक्खु शरणानंद महाथेरो, स्वागताध्यक्ष राजेंद्र घोडके, प्रमुख पाहूणे म्हणून डॉ.एस.पी.गायकवाड, डॉ.अरविंद गायकवाड, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष संदिप उपरे यांच्यासह देशभरातून आलेल्या भंतेंची लक्षणीय उपस्थिती होती.

उपस्थितांना संबोधित करताना भंते के. संघरक्षित महाथेरो म्हणाले की, तरुणांच्या उमलत्या मनावर धम्मसंस्कार रूजावेत, त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळावे त्याकरिता धम्मसंस्कार शिबीरे आणि धम्म परिषदा होणे नितांत गरजेचे आहे. तथागत सिध्दार्थ गौतम बुध्दांनी मांडलेले तत्वज्ञान माणसाला माणसासारखे रहायला, वागायला शिकविते. त्यामुळे आजच्या युवा पिढीला बुध्दांच्या विचारांची अत्यंत गरज आहे. त्यामुळे बुध्दांच्या धम्माचा प्राचर आणि प्रासर अशा धम्मसंस्कार शिबीरांच्या तसेच धम्म परिषदांच्या माध्यमातून होणे देखील तिथकेच महत्वाचे आहे, असल्याचे धम्मविचार भंते के. संघरक्षित महाथेरो यांनी व्यक्त केले. या बौध्द धम्म परिषदेचे प्रस्ताविक प्रा.प्रदिप रोडे यांनी केले. या बौध्द धम्म परिषदेला भिक्खू बोधीपालो महाथेरो, भिक्खू प्रा.डॉ.एम.सत्यपाल महाथेरो, भिक्खू यशकाश्यपायन महाथेरो, भिक्खू करूणानंद थेरो, भिक्खू ज्ञानरक्षित थेरो, भिक्खू एम.धम्मज्योती थेरो, भिक्खू काश्यप थेरो, भिक्खू हर्षबोधी थेरो, भिक्खू पय्यातीस थेरो, भिक्खू महाकाश्यप थेरो, भिक्खू मुदितानंद थेरो, भिक्खू शिवली बोधी थेरो, भिक्खू धम्मदर थेरो, भिक्खू धम्मरक्षित, भिक्खू पय्यानंद, भिक्खू शीलरत्न, भिक्खू सुभूती, भिक्खू दिपंकर, भिक्खू बोधिशील, भिक्खू संघपाल, भिक्खू नागसेनबोधी, भिक्खू संघप्रिय, भिक्खू रेवतबोधी, भिक्खू एस.नागसेन यांच्यासह आदी भन्ते यांनी आपली उपस्थिती दर्शवून उपस्थितांना धम्मदेशना दिली. ही बौध्द धम्म परिषद यशस्वि करण्यासाठी परिषदेचे संयोजक भन्ते धम्माशिल यांच्यासह प्रिशदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था, वर्षावास तसेच बुध्दविहार सयोजन समितीसह सर्व बौध्द उपासक-उपासिका यांनी केले मोलाचे परिश्रम घेतले.

Tuesday 5th of November 2019 04:45 PM

Advertisement

Advertisement