Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

काढणीचा खर्च काढायचा तरी कसा? शेतकर्‍यांसमोर समस्या

अंबाजोगाई : अंबाजोगाई  - सलग दोन वर्ष दुष्काळाशी सामना करणार्‍या बीडकरांना यावर्षी कशीबशी साथ दिली. त्यावरच शेतकर्‍यांनी पेरणी केली. पिकही जोमात आली. मात्र परतीच्या पावसाने कहर केल्याने पिके पाण्यात गेली. सततच्या पावसाने काढणीसाठी अनेक समस्या शेतकर्‍यांपुढे उभ्या राहिल्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने मिळू शकला नाही. परिणामी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना काढणी खर्च कसा भागवायचा ही समस्या भेडसावत आहे. अंबाजोगाई तालुक्यात नऊ हजार हेक्टर क्षेत्रातील खरीपाच्या नुकसानीचा प्रथम अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सलग दोन वर्ष दुष्काळाची गेली खरीपाचा हंगाम आपुर्‍या पावसामुळे कसाबसा पार पडेल असे वाटले होते. पण परतीच्या पावसाने जे हाती आले. तेही गमवावे लागले. शेतात पाणी शिरल्याने सोयाबीन काढायचे म्हटले तर प्रति बॅग एकरी चार हजार रूपये खर्च येतो. केवळ काढणीसाठी बारा हजार रूपये लागतात. पुन्हा उगवलेले तन नष्ट करण्या करिता असलेला खर्च  वेगळा अशा स्थितीत उत्पादन तर काहीच नाही मग अशा परिस्थितीत खर्च काढायचा कसा असा प्रश्‍न शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पुस शिवारात शेती करणारे प्रकाश चोरमले यांचा हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे अडीच एकरातील सोयाबीनचे पिक हातचे गेले. कौटुंबिक आडचणीसह मुलीच्या लग्नाबाबत ते चिंतेत होते. अंबाजोगाई तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाची हजेरी असली तरी त्यात मुळीच खंड नसायचा साधारणतः सकाळ, दुपार, संध्याकाळ व कधी रात्री मुक्कामाला पाऊस असल्याने शेतकर्‍यांची मोठी अडचण झाली. शेतात पाणी शिरल्याने शेतीची कामे करणे शेतकर्‍यांना अवघड झाले.

त्यातच शेतकर्‍यांना मुबलक पैसा देणार्‍या सोयाबीन या पिकाची दुरावस्था झाली व सोयाबीन काढण्यासाठी मोठी अडचण झाली. अंबाजोगाई तालुक्यातील पुस परिसरात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या. सोयाबीन पिकात प्रचंड पाणी शिरल्याने दोन ते तीन दिवस पिकांची हीच अवस्था होती. पुस येथील शेतकर्‍यांना 2018 चा खरीप हंगामाचा पिक विमा मंजुर झाला. निम्म्या लोकांना वाटप ही झाले. मात्र अद्यापही गावातील अर्धा शेतकरी विम्याच्या रक्कमेपासुन वंचित आहेत. पिक विमा रक्कमेपासुन वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना पिक विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी. त्याच बरोबर परतीच्या पावसाने झालेल्या पिकांची नुकसान भरपाई दिली जावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. अंबाजोगाई तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीनचा 55 हजार 75 हेक्टर क्षेत्रात, कापसाचा 4 हजार 129 हेक्टर तर 1166 हेक्टर क्षेत्रात बाजरीचा पेरा झाला आहे. 2552 हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी झाली होती. जवळपास सात हजार 116 हेक्टरातील सोयाबीन आणि 230 हेक्टर क्षेत्रातील कपाशीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अंबाजोगाई तालुक्यात जवळपास 9 हजार हेक्टर क्षेत्रातील खरीपांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रत्येक्ष पाहणी आणि पंचनाम्यानंतर नुकसानीचे क्षेत्र आणि आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Tuesday 5th of November 2019 04:30 PM

Advertisement

Advertisement