Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

तीन दुचाकींच्या विचित्र अपघातात तिघे ठार

माजलगाव : माजलगाव : गढी रोडवरील एमआयडीसीजवळील वळण रस्त्यावर तीन बाईकच्या विचित्र अपघातात एका महिलेसह दोनजण जागीच ठार झाले. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात इतर दोघे गंभीर जखमी असून त्यांना अधिक उपचारासाठी बीड येथे रवाना करण्यात आले आहे.

येथील एमआयडीसीजवळ असलेल्या बुखारी शाळेजवळ एक वळण रस्ता असून या ठिकाणी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तीन बाईकमध्ये ( क्रमांक एम.एच. 12 क्यू.डी. 3207 , एम.एच. 47 ए. एफ. 0765 ) विचित्र अपघात झाला. या अपघातात तिन्ही बाईकचा अक्षरशः चुराडा झाला आहे. यात बाईकवरील गणेश श्रीकिसन मिसाळ (30 रा. देवळा ता. सेलू जी. परभणी) व अनोळखी महिला व पुरुष जागीच मृत झाली. तर अपघातात शंकर जितू भोसले, अजित भोसले ( रा. केकात पांगरी ता. गेवराई) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी बीड येथे रवाना करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके, धोंडीराम मोरे, बाबरे , विठ्ठल राठोड, सहा. फौजदार शेळके, अनिल अत्तेवर यांनी येऊन मृतदेह उचलून ग्रामीण रुग्णालयात पाठवले तसेच खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.

Monday 4th of November 2019 09:00 PM

Advertisement

Advertisement