Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी एक लाख रूपयांची मदत करा

संभाजी ब्रिगेडचे निवेदन

अंबाजोगाई : अंबाजोगाई (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात सतत कोरडा व ओला दुष्काळ पडत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होत आहे. सोयाबीन, कापुस, उडीद, मुग, तीळ, बाजरी, पिवळा अशा पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून सरकारी यंत्रनेने कसल्याही प्रकारच्या पंचनाम्याचे नाटक न करता तात्काळ शेतकर्‍यांना प्रती हेक्टरी एक लाख रूपये मदत द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना सोमवार दि. 4 नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

सदरील निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण ठोंबरे, रामकिसन मस्के, विजय भोसले, संभाजी वाळवटे, लहुजी शिंदे, ऋषीकेश कडबाने, परमेश्‍वर शिंदे, मुन्ना काकडे, प्रदिप पौळ, बालु पारेकर, मोरे, नानासाहेब धुमाळ, चंद्रकांत मोरे, संजय पालकर, भालचंद्र साळुंके आदींसहीत इतरांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Monday 4th of November 2019 04:30 PM

Advertisement

Advertisement