Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

चिंतेने तरूण शेतकर्‍याचा हृदयविकाराने मृत्यू

अवकाळी पाऊसाने सोयाबीन हातचे गेले

अंबाजोगाई : अंबाजोगाई  - अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील 45 वर्षीय शेतकर्‍याला अडीच एक्कर शेती होती या शेतीमध्ये अवकाळी पावसाने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्यामुळे चिंतेत असलेल्या 45 वर्षीय तरूण शेतकर्‍याचा आज सकाळी तिव्र हृदय विकाराच्या धक्का येवून मृत्यू झाला. यामुळे हे कुटुंब अवकाळी पावसाला बळी ठरल्याचे शेतकर्‍यातून बोलल्या जात आहे. प्रकाश कारभारी चोरमले हे मयत शेतकर्‍याचे नाव आहे.

प्रकाश कारभारी चोरमले यांना पुस शिवारात रेणानदी परिसरात अडीच एक्कर शेती असून शेतीमध्ये सोयाबीनचे पिक घेतले होते. या पिकामध्ये परतीच्या पावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मुलगी वयात आल्यामुळे तिचे लग्न कसे करावे या चिंतेत हा शेतकरी मागील दोन दिवसापासुन होता. रात्री जेवन करून झोपल्यानंतर सकाळी कसे उठले नाही ते पाहण्यासाठी पत्नी त्यांच्या रूममध्ये गेली असता ते बेशुद्ध अवस्थेत दिसून आले. त्यांना तात्काळ स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता सोमवारी सकाळी 9.30 च्या दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. मागील खरीप पिकाचा पिक विमा अद्यापही अंबाजोगाई तालुक्यातील बहुतांशी शेतकर्‍यांना मिळाला नाही.

यावर्षी परतीच्या पावसाने खरीपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मुलगी वयात आल्यामुळे तिचे लग्न कसे करावे या चिंतेत मागील दोन दिवसापासुन ते तणावग्रस्त होते. या तणावातून त्यांचा आज अंतः झाला. खरीपाच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाली असली तरी महसुल व कृषी प्रशासनाने अद्यापही शेतकर्‍यांना तातडीची मदत केलेली नाही. त्यामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. मयत शेतकर्‍याच्या पश्‍चात वृद्ध आई-वडील, पत्नी, 18 वर्षाची मुलगी, व 20 वर्षाचा मुलगा अशी अपत्य आहेत. त्यांच्या कुटुंबावर ओढावलेले संकट दुर करण्यासाठी प्रशासनाने या कुटुंबांना तातडीची मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. या प्रकरणी स्वाराती रूग्णालय परिसरातील पोलिस चौकी शेतकर्‍याच्या मृत्यू प्रकरणी नोंद झाली असून पुढील तपासासाठी ते बर्दापुर ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

* हृदयविकाराने शेतकर्‍याचा मृत्यू अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील शेतकरी प्रकाश चोरमले यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असून त्यांच्या शरिराची उत्तरीय तपासणी केली असताना त्यांचा मृत्यू चिंतेमुळे हृदयविकाराचा झटक्याने त्यांचे निधन झाले असल्याचा प्राथमिक अहवाल आला असून त्याच्या व्हिशेराचे शामपल प्रयोग शाळेकडे पाठविण्यात येणार आहेत. त्याचा अंतिम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. - डॉ.विश्‍वजीत पवार, न्यायवैद्यक शास्त्र विभाग,स्वाराती, अंबाजोगाई

Monday 4th of November 2019 03:45 PM

Advertisement

Advertisement