Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

सोशल मिडीयावरून घेतली जातेय राजकारणाची फिरकी

अंबाजोगाई : अंबाजोगाई - विधानसभांचे निकाल लागुन 10 ते 12 दिवस उलटले तरी सरकार स्थापन होण्याचे नाव नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने सरकार स्थापन करण्यात रस नसल्याचे स्पष्ट केले असताना भाजप व शिवसेना यांच्यात महत्वाच्या खात्यावरून सुरू असलेली हमरी तुमरी आणि राजकारणाचा खेळ यामुळे नेटकर्‍यांचे  चांगलेच मनोरंजन बनले आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल साईटवरून व्हॉटसॅअपवरून मिनिटामिनिटाला पडत आहेत. शिवसेना-भाजपा यांच्यात सत्ता पदावरून होत असलेली चर्चा याची चांगलीच मजा उडत आहे.

कोणी मुख्यमंत्री होणार नसेल तर मी मुख्यमंत्री होवू का? असे रामदास आठवले विचारतात तेंव्हा त्यांच्याही पोस्ट व्हायरल होत आहेत. सरकार आणि पाऊस यांच्यातही संबांध जोडला गेला असून स्थापन होईपर्यंत मी परतणार नसल्याचे पावसाने ठरविले आहे. असेच अनेक चित्र सोशल मिडीयावरून झळकत आहेत. देवेंद्र फडणवीस ‘मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल’ असे म्हणत असताना ते येत नाहीत. पाऊस मात्र रोजच येत आहे. याचीच आठवण नेटकरी करून घेत आहेत. अनेक महत्वपुर्ण व्यंकगचित्रातुन शिवसेना- भाजपा यांच्या चित्रांचे रोजच प्रदर्शन होत आहे. भाजपाचे आमदार जास्त असूनही एका तराजूत शिवसेनेचेच आमदार पारडे खाली झुकत असल्याच्या व्यंगचित्रांनी लोकांना हसविले आहे. दुसर्‍या एका व्यंगचित्रात मुख्यमंत्री फडणवीस, शिवसेना पक्षनेते उद्धव ठाकरे हात जोडून संजय राऊतांना विनंती करीत असल्याचे चित्र देखील मोठ्या प्रमाणात व्हॉटसॅअ‍ॅप वरून फिरत आहे. अशा एक नव्हे तर अनेक  सोशल मिडीयाच्या पोस्ट सत्ता स्थापनेवरून राजकारण्याची फिरकी घ्यावयास रोजच व्हायरल केल्या जात आहेत.

Monday 4th of November 2019 03:00 PM

Advertisement

Advertisement