Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही : खा.डॉ.प्रितम मुंडे

बीड : बीड -अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात पिकांची हानी झाली आहे.अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यासाठी ना.पंकजाताई मुंडे यांच्या आदेशानुसार थेट बांधावर जाऊन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी नुकसानीची पाहणी केली. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे हताश होऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वस्त करत एकही शेतकरी नुकसान भरपाईच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असा विश्वास खा.प्रितमताई मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला.

अतिवृष्टीने झालेल्या हानीची पाहणी करताना खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी जिल्ह्यातील गेवराई,बीड,वडवणी व परळी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. निसर्गाच्या अवकृपेमुळे दुष्काळात होरपळनाऱ्या बीड जिल्ह्याला अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा संकटाला तोंड द्यावे लागत असल्याने दुःख झाल्याचे खा.प्रितमताई मुंडे यांनी बोलताना सांगितले. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसरन करण्यासाठी ना.पंकजाताई मुंडे यांच्या आदेशानुसार नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी ना.पंकजाताई मुंडे प्रयत्न करीत असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या कडक सूचना ना.पंकजाताई मुंडे यांनी प्रशासनाला अगोदरच केल्या आहेत असे खा.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले.

राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करावा व कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये अशा सूचना खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी प्रशासनाला केल्या. दरम्यान गेवराई तालुक्यातील वाकनाथपुर येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी खा.प्रितमताई मुंडे यांनी बैलगाडीने नदीपार करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व संकट कोणतेही असो आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास दिला.

परतीच्या पावसाने झालेल्या प्रचंड हानीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून खरीपाचे तोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे.यासंदर्भात लोकप्रतिनिधी,बँक प्रतिनिधी व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची दि.०४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.वा जिल्हाधिकारी कार्यालयात खा.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव येथील तरुण शेतकरी सोमनाथ ज्ञानोबा दहिफळे (२२) यांनी अतिवृष्टीने नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली होती. खा.प्रितमताई मुंडे यांनी मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

Monday 4th of November 2019 02:30 PM

Advertisement

Advertisement