Breaking News

  • आ. संगीता ठोंबरे आणि विजयप्रकाश ठोंबरेंवर गुन्हा दाखल..

मतदारांच्या गाठीभेटीने नमिता मुंदडा यांच्या प्रचाराचा "शुभारंभ"

मुदडांना विजयी करण्याचा मतदारांचा निर्धार

अंबाजोगाई : अंबाजोगाई - मतदार हा आपला मुख्य घटक असुन मतदारांच्या पाठींब्यावरचं आपला विजय निश्चित आहे स्व.डॉ. विमलताई मुंदडा यांनी मतदारसंघाच्या पाठिंब्यावरच मतदारसंघाचा कायापालट केला हीच परंपरा पुढे नेवुन मतदारांच्या विकासासाठी काम करण्याचा संकल्प करत केज मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी मतदारांच्या गाठीभेटीने आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला,त्यांच्या या मोहीमेला मतदारांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत विजयी करण्याचा निर्धार केला.

बुधवारी योगेश्वरी देवीच्या मंदिरात आरती करुन नारळ फोडण्यात आला त्यानंतर त्यांनी मतदारांशी संवाद साधण्यासाठी शहरात घरोघर जावुन प्रचार करण्याच्या मोहीमेला प्रांरभ केला मतदारांच्या प्रश्नासाठी आपण सातत्याने संघर्ष करुन मतदारांना न्याय देवु अशी ग्वाही नमिता मुंदडा यांनी दिली.स्व.डॉ.विमलताई मुंदडा यांची विकास कार्याची संकल्पना पुढे नेण्यासाठी मतदारसंघाच्या सहकार्यावर हे काम आपण करत आहोत या कामाला मतदारांच्या उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंडीबाजार,पाटील चौक,कुत्तर विहीर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी ही प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी भाजपा - शिवसेना - रिपाइं - रासप - रयत क्रांती सेना महायुतीचे सर्व नेते,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday 9th of October 2019 08:15 PM

Advertisement

Advertisement