Breaking News

  • आ. संगीता ठोंबरे आणि विजयप्रकाश ठोंबरेंवर गुन्हा दाखल..

शेततळ्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

अंबाजोगाई : अंबाजोगाई : पतंग उडवताना शेततळ्यात पडलेला पतंग काढण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास अंबाजोगाई तालुक्यातील पोखरी येथे घडली.

प्रतिक बाळासाहेब यादव (वय १२) असे मृत मुलाचे नाव आहे. तो अंबाजोगाई येथील व्यंकटेश विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत होता. बुधवारी त्याने प्रथम सत्राची तोंडी परीक्षा दिली होती. त्यानंतर तो गावाकडे गेला होता. बुधवरी दुपारी प्रतीक बाळासाहेब यादव व त्याचा मित्र जाधव हे दोघेजण गावातील शाळेजवळ पतंग उडवत होते. खेळताना पतंग तुटला व जवळच असलेल्या संदिपान शिंदे यांच्या शेतामधील शेततळ्यात पडला. पतंगाच्या मागोमाग दोघाही मित्रांनी शेततळ्याकडे धाव घेतली. काठावर थांबून पतंग काढण्यासाठी प्रतीक प्रयत्न करत असताना अचानक त्याचा पाय घसरून तो थेट शेततळ्यात पडला. प्रतीकला पोहता येत नव्हते त्यामुळे तो पाण्यात बुडाला. ही घटना कळेपर्यंत खूप उशीर झाला होता. नंतर ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, अंबाजोगाई ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला. प्रतिक यादव याच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

Wednesday 9th of October 2019 08:15 PM

Advertisement

Advertisement