Breaking News

  • आ. संगीता ठोंबरे आणि विजयप्रकाश ठोंबरेंवर गुन्हा दाखल..

माजलगाव मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी रमेश आडसकर यांना विजयी करा - अर्चना आडसकर

माजलगाव : माजलगाव (प्रतिनिधी)- माजलगाव मतदारसंघातील भाजपा,शिवसेना,रिपाइं,रासप, रयत क्रांती सेना महायुतीचे उमेदवार रमेशराव आडसकर यांची बाजू दिवसेंदिवस बळकट होत चालली आहे. त्यामुळे माजलगाव मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी रमेशराव आडसकर यांना विजयी करावे असे आवाहन बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सौ.अर्चनाताई आडसकर यांनी केले आहे. माजलगाव मतदारसंघात सौ.अर्चनाताई रमेशराव आडसकर यांनी उपळी येथे आयोजित प्रचार संपर्क दौर्‍यात बोलताना सदरील आवाहन केले. अर्चनाताई आडसकर यांच्या मतदार संवाद दौर्‍यास सर्वत्र उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

बेरजेचे राजकारण करणारे आडसकर यांची दिवसेंदिवस ना.पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्त्व बळकट करणे, भाजपाचा जनाधार वाढविणे, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि माजी आमदार बाबुरावजी आडसकर साहेब या दोन नेत्यांप्रमाणे सर्वांना सोबत घेवून समाजकारण करण्याचे काम रमेशराव करीत आहेत. आडसकरांच्या हाबाड्याने राष्ट्रवादीचे सोळंके सध्या तरी हतबल झाल्याचे दिसत आहेत. आडसकरांना मिळणारा प्रतिसाद पाहता माजलगाव मतदारसंघात भाजपा महायुतीचे रमेश आडसकर दिवसेंदिवस विजयाच्या समिप जात आहेत.कारण,माजलगाव मतदार संघातील भाजपाचे, शिवसेनेचे,रिपाइंचे,रासपचे आणि रयत क्रांती सेनेचे सर्व नेते,पदाधिकारी हे आडसकर यांच्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत. गेल्या पाच वर्षांत पालकमंत्री पंकजाताईंच्या माध्यमातून विद्यमान आमदार आर.टी. देशमुख यांनी केलेली विकास कामे जनता विसरलेली नाही. भाजपाने केवळ विकास हेच ध्येय ठेवून सामान्य माणूस, शेतकरी,कष्टकरी आणि गोर गरीब जनतेला विविध प्रकारे सन्मान व सक्षम करण्याचे काम केले आहे.

माजलगाव मतदार संघात मागील दोन तीन वर्षापासून रमेशराव आडसकर यांनी सर्व गावे,खेडे व वस्ती तांडे या ठिकाणी जावून सर्वसामान्य माणसांचे प्रश्‍न समजावून घेतले. मतदारांशी संवाद साधला. देशात नरेंद्रजी मोदी व राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांची सत्ता असल्याने बीड जिल्ह्यात ना.पंकजाताई यांच्या माध्यमातून विकासाची गंगा वाहत आहे.पुढील काळात माजलगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे होणार आहेत.राज्यात आघाडीचे सरकार असताना माजलगाव मतदार संघाला मंत्रीपद मिळाले होते.परंतु,या मंत्रीपदाचा फायदा मात्र माजलगावाचे जनतेला झाला नाही, रस्त्याचे,आरोग्याचे, शिक्षणाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विद्यमान आ.आर.टी.देशमुख यांनी गेल्या पाच वर्षात अतिशय चांगले कार्य केले.त्यामुळे जनतेला भारतीय जनता पक्षावर विश्‍वास निर्माण झाला आहे.

बीड जिल्ह्याच्या पालकमंंत्री ना.पंकजाताई मुुंडे यांच्या माध्यमातून पुढील काळात माजलगाव मतदार संघाचा सर्वांगीण आणि चौफेर विकास करण्यासयाठी भाजपा महायुतीचे रमेशराव आडसकर हे मतदारांसमोर सक्षम पर्याय असल्याचे दिसू लागले आहे. गेल्या काही दिवसात आडसकरांना मिळणारा माजलगाव मतदार संघातील अठरापगड जातीधर्म व समाजबांधवांचा प्रतिसाद पाहता रमेश आडसकरांचा विजयी दिवसेंदिवस सोपा होत असल्याचे दिसू लागले आहे. रात्रंदिवस मतदारांना उपलब्ध असलेले,जनतेचे प्रश्‍न सोडविणारे उमेदवार रमेशराव प्रचंड मतांनी विजयी होणार अशीच परिस्थिती माजलगाव मतदार संघात निर्माण झाली आहे. रमेशराव यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाचा नवा पर्याय माजलगावकरांना उपलब्ध झाला आहे.त्यामुळे महायुतीच्या विजयाचा वारु माजलगाव मतदारसंघात जोरात धावत आहे. मितभाषी, कोणावर टिका न करता प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे नेतृत्त्व म्हणून रमेश आडसकरांकडे पाहिले जात आहे.त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधक हैराण झाले आहेत. अर्चनाताई आडसकर यांनी उपळी येथे जिल्हा परिषद सर्कल मध्ये संपर्क दौरा करून मतदार बांधवांशी संवाद साधला. भाजपाच्या प्रचार दौर्‍यांना महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

Wednesday 9th of October 2019 05:00 PM

Advertisement

Advertisement