Breaking News

  • आ. संगीता ठोंबरे आणि विजयप्रकाश ठोंबरेंवर गुन्हा दाखल..

आडसकरांना विजयी करणार माजलगाव मतदार संघातील युवकांचा निर्धार

आडसकरांच्या प्रचारार्थ युवकांची फौज उभी

माजलगाव : माजलगाव (प्रतिनिधी)- माजलगाव मतदारसंघातील भाजपा, शिवसेना,रिपाइं, रासप,रयत क्रांती सेनआ महायुतीचे उमेदवार रमेशराव आडसकर यांच्या प्रचारार्थ युवक वर्ग याने पुढाकार घेतला असून भाजपा महायुतीने प्रभावी प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे. आडसकरांना माजलगाव मतदार संघातून मताधिक्य देण्याचा निर्धार मतदार युवकांनीच केल्याचे दिसून येत आहे.

रमेश आडसकरांच्या प्रचारार्थ प्रभावी प्रचार यंत्रणा राबविली जात आहे.बेरजेचे राजकारण करणारे रमेशराव हे जनतेला आपले नेते वाटू लागले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रचार यंत्रणा कोलमडून पडली आहे. आडसकरांच्या हाबाड्याने राष्ट्रवादीचे नेतृत्व सैरभैर झाले आहे.राष्ट्रवादीचे विद्यमान उमेदवार यांना मंत्रिपद मिळूनही माजलगावाचा विकास न झाल्याने माजलगावकर रमेश आडसकरांकडे नवा पर्याय म्हणून पाहत आहेत.केंद्रांत व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने रमेश आडसकर हेच पालकमंत्री पंकजाताईंच्या माध्यमातून माजलगाव मतदार संघाचा चेहरा मोहारा बदलतील असा विश्‍वास मतदारांना वाटत आहे.त्यामुळे माजलगाव मतदारसंघात भाजपा उमेदवार रमेश आडसकर यांना सर्वत्र उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

माजलगाव विधानसभा मतदारसंघातून अनेक गावांमध्ये युवक भाजपा कार्यकर्ते हे मतदारांशी थेट संवाद साधून संपर्क अभियान प्रभावीपणे राबवित आहेत. विविध गावात जावून मतदारांशी संवाद साधला व आडसकरांना विजयी करण्याचे आवाहन केले. माजलगाव मतदारसंघाचा चेहरा मोहारा बदलण्याचे काम भाजपाच्या माध्यमातून होणार असल्याचे सांगुन भाजप कार्यर्ते हे डोअर-टू-डोअर जावून प्रचार करीत आहेत. गेल्या पाच वर्षांत विद्यमान आमदार आर.टी.देशमुख यांनी पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणला.विकासाची हीच प्रक्रिया अखंडित ठेवण्यासाठी मतदारांनी भाजपाला मतदान करावे असे आवाहन महिला कार्यकर्त्यांनी केले आहे. ग्रामीण भागात शौचालय,गॅस सबसिडी, गोरगरीबांना मोफत गॅस वाटप तसेच जनऔषधी या केंद्र सरकारच्या योजनेमुळे भारतीय जनता पक्ष सरकारच्या लोकोपयोगी कार्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचे हात बळकट करण्यासाठी मतदारांनी भाजपा महायुतीचे उमेदवार रमेशराव आडसकर यांना मताधिक्य देवून विजयी करावे असे आवाहन माजलगाव मतदार संघातील युवक करीत आहेत.

Wednesday 9th of October 2019 05:00 PM

Advertisement

Advertisement