Breaking News

  • आ. संगीता ठोंबरे आणि विजयप्रकाश ठोंबरेंवर गुन्हा दाखल..

नवरात्रीनिमित्त देवळा श्रमकरी ग्रुपचे अकोला येथे रक्तदान

देवळा श्रमकरी ग्रुपचा स्तुत्य उपक्रम

अंबाजोगाई : अंबाजोगाई - दिनांक 2 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत दान उत्सव सप्ताह पुर्ण देश भरात साजरा करण्यात आला.नवरात्र उत्सवात दरवर्षी देवळा श्रमकरी ग्रुपचा वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग असतो.या वर्षी नवरात्री निमित्त देवळा श्रमकरी ग्रुप, अकोला ग्रामपंचायत व शासकीय रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.त्यात 40 ते 45 रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करून दान उत्सव साजरा केला. तसेच यावेळी अनेकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प जाहिर केला.

पारंपारिक उत्सव यांना अंधश्रद्धेचे स्वरूप न देता देवळा श्रमकरी ग्रुपच्या सदस्यांनी आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाच आपण काही तरी देणं लागतो याच भावणेने आपण दान केले पाहिजे.आपल्याकडे असणारी कोणतीही गोष्ट जी की,दुसर्‍याच्या गरजेची असु शकते ती या नवरात्रात दान करुन नवरात्र व दान उत्सव साजरा करण्याचे ठरविले. त्यानूसार अकोला ग्रामपंचायत व देवळा श्रमकरी ग्रुपने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास शासकीय रक्तपेढीचे सुजित तुम्माड,शशिकांत पारखे, संतोष दासरवाड,श्रीनिवास आगळे,मुख्यमंत्री दूत दत्तात्रय शिंगाडे,बाळासाहेब यादव, संजय शेवाळे तसेच मानवलोक संस्थेचे सहकार्यवाह लालासाहेब आगळे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून रक्तदान केले.पाणी फाउंडेशन अंबाजोगाई तालुक्याचे समन्वयक शिवराज बागल, शिवतेज टेकर्सचे संतोष शेळके, एन साई हॉस्पिटलचे बजरंग यशवंत,हिंद महालॅबचे बाबासाहेब यशवंत,मनस्विनी महिला प्रकल्पाचे तुषार सोनवणे,सचिन पारीख,माऊली मंडपचे प्रकाश सगट,रामचंद्र सगट,महादेव कदम, अशोक खामकर,राजेश यशवंत,आशिष निळकंठ,गणेश भालेकर यांनी पण,शिबीरास उपस्थित राहुन रक्तदान केले.यावेळी तरुणांचा उत्साह वाढवण्यासाठी देवळा श्रमकरी ग्रुपचे रविंद्र देवरवाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन केले.पुढे ते म्हणाले की,आपण करत आसलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.जर तुम्ही पाप पुण्य मानत असाल तर सर्वात जास्त पुण्य यातुन कमवाल आपल्या एक रक्त पिशवी दानामुळे तीन व्यक्तीचे जीवन वाचविले जाते,रक्तदान केल्याने आपले ही आरोग्य चांगले राहते.पण,समाजात रक्तदाना विषयी अनेक गैरसमज आहेत ते आपण सर्वांनी मिळून दूर करावे.असे आवाहन रविंद्र देवरवाडे यांनी केले.तसेच देवळा श्रमकरी ग्रुपचे सदस्य व अफार्म पुणे या संस्थेचे क्लस्टर मॅनेजर गणेश आगळे यांनी सुत्रसंचालन व रक्तदान करून रक्तदान शिबीर आयोजित करण्यामागची भुमीका व रक्तदानातुन आरोग्याचे फायदे आणि त्यातुन अनेकांचे वाचणारे प्राण यामुळे आपल्याला लाभणारे समाधान खुप मोठे असते म्हणून तरुणांनी प्रत्येक तिन महिन्यांने एकदा रक्तदान करावे असे सांगितले. मआपण कोणाच्या तरी कामी पडतोय. तसेच आपल्या ग्रुपचे ब्रिद वाक्यच आहे की,‘जिथं कमी,तिथं आम्ही‘ हे शिबीर यशस्वी करण्यासाठी भाऊसाहेब खामकर,बाळू चौरे,विकास पांचाळ,सुचित पांचाळ,सोनवणे वशिष्ठ,प्रणित आव्हाड,माणिक आदमाने,प्रवीण आव्हाड,परमेश्‍वर दंडवते,आश्रूबा उमाप,भास्कर शेवाळे,निलेश साळुंके,यशवंत शेवाळे,तानाजी पाटील,महारुद्र देवरवाडे,साईनाथ उमाप आदींचे सहकार्य लाभले.

Wednesday 9th of October 2019 02:45 PM

Advertisement

Advertisement