Breaking News

  • आ. संगीता ठोंबरे आणि विजयप्रकाश ठोंबरेंवर गुन्हा दाखल..

परळी तालुक्यातील विविध विकास कामांचा खा.प्रितमताईंच्या हस्ते शुभारंभ

परळी : परळी.दि.०९------राज्याच्या ग्रामविकास,महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून परळी मतदार संघासाठी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी बोलताना “पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी सर्वांना सोबत घेऊन सर्व घटकांना न्याय दिल्यामुळे सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंदाचे हसू उमलले आहे अशा शब्दात खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

परळी तालुक्यातील गोवर्धन,खारी तांडा,जयगाव,पाडुळी, तपोवन,औरंगपूर,हसनाबाद,भिलेगाव,परचुंडी,मलनाथपुर,रेवली,वाका या गावांमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ करताना खा.डॉ.प्रितमताई मुंडे बोलत होत्या.यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खा.प्रितमताई म्हणाल्या “गत पाच वर्षाच्या काळात परळी मतदार संघाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करत असताना पंकजाताईंनी कोणतीही अपेक्षा बाळगली नाही.सर्व सामान्यांच्या उत्थानासाठी विविध योजना व हजारो कोटींच्या निधीद्वारे स्वप्नवत वाटणारी विकास कामे प्रत्यक्षात पूर्ण करून परळी मतदार संघातील जनतेच्या पायावर सत्ता आणून ठेवण्याचे काम पंकजाताईंनी केले आहे.

परळी मतदार संघाच्या जनतेने दिलेल्या प्रेम व आशिर्वादांचे सोने करून परळीचे नाव देशात उज्वल करण्याची परळीकरांची अपेक्षा पंकजाताईंनी सार्थ ठरवली आहे.मतदार संघाचा भौतिक विकास करत असताना पंकजाताईंनी सामाजिक विकासाला प्राधान्य देऊन महिलांना बचत गटांच्या माध्यमातून सक्षम केले आहे.आज परळी मतदार संघातील महिलांच्या हाती पैसा येत असून कुटुंबांचा आर्थिक कणा म्हणून महिलांना सन्मान मिळत आहे.अशा संवेदनशील व दूरदृष्टी लाभलेल्या नेतृत्वाचे हात बळकट करण्यासाठी परळीची जनता पुन्हा एकदा पंकजाताईंच्या पाठीशी आशीर्वाद उभे करील असा विश्वास याप्रसंगी खा.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केला.

यावेळी अनेक गावांमध्ये ग्रामसंघ ईमारत,२५/१५ लेखाशीर्ष निधी अंतर्गत रस्ते, सामाजिक सभागृह,व्यायाम शाळा,नाना नाणी पार्क,ओपन जिम,सार्वजनिक वाचनाल,ग्राम पंचायत ईमारत अशा विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला तसेच ठिकठिकाणी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी जेष्ठ नेते भीमराव मुंडे, वृक्षराज निर्मळ,सुधाकर पोळ,हनुमंत नागरगोजे,बिभीषण फड,रवि कांदे,रवी चाटे यांच्यासह भाजपचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tuesday 10th of September 2019 04:45 PM

Advertisement

Advertisement