Breaking News

  • आ. संगीता ठोंबरे आणि विजयप्रकाश ठोंबरेंवर गुन्हा दाखल..

गौरी पूजनाला खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या परळीत विविध ठिकाणी भेटी

परळी : परळी - मांगल्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या मंगला गौरींच्या सणानिमित्त खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी परळी शहरातील विविध ठिकाणी भेट देऊन मंगला गौरींचे दर्शन घेतले.महिलांच्या जिव्हाळ्याचा सण म्हणून गौरी आगमनानिमित्त महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असताना खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी परळी शहरातील विविध भागात घरोघरी भेटी देऊन महिलांचा आनंद द्विगुणित केला.

गणरायासोबत माहेरपणासाठी आलेल्या गौरींच्या स्वागतासाठी परळी शहरात घरोघरी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. गौरी पूजन व हळदी कुंकवानिमित्त तसेच गौरींसाठी केलेली आकर्षक सजावट बघण्यासाठी महिला एकत्रित येतात.खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनीही यावेळी हळदी कुंकू व गौरी पूजनानिमित्त भेटी देऊन महिलांशी संवाद साधला.महिलांच्या अत्यंत आवडत्या व जिव्हाळ्याच्या सोहळ्यात खा.प्रितमताई मुंडे यांनी घरोघरी भेटी देऊन गौरीपूजन व हळदी कुंकवात सहभाग घेतल्याने महिलांचा आनंद द्विगुणित झाला.यावेळी ठिकठिकाणी महिलांनी खा.प्रितमताईंचे आपुलकीने स्वागत केले.

परळी शहरातील थर्मल कॉलनी,हालगे गल्ली,विवेकानंद नगर,पदमावती गल्ली,गुरुकृपा नगर,स्वाती नगर,घरनीकर रोड या भागातील घरोघरी भेटी देऊन खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी गौरी पूजनानिमित्त गौरींचे दर्शन घेतले व शहरातील अस्तित्व गणेश मंडळ,गजराज गणेश मंडळाला भेट देऊन गणरायाचे पूजाअर्चा केली.यावेळी जुगलकिशोर लोहिया,पवन मुंडे,उमा समशेट्टे,डॉ.शालिनी कराड,पवन मोदानी, अनिष अग्रवाल,सचिन गित्ते,मोहन जोशी,रवी वाघमारे,अबू आघाव,प्रवीण बिडगर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Saturday 7th of September 2019 09:15 PM

Advertisement

Advertisement