Breaking News

  • आ. संगीता ठोंबरे आणि विजयप्रकाश ठोंबरेंवर गुन्हा दाखल..

ना. पंकजा मुंडे यांचे औरंगाबादच्या महिला मेळाव्यात तडाखेबंद भाषण

पंतप्रधानांचेही जिंकले मन

VSNN : औरंगाबाद - ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या महिला बचतगटांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांचे आज तडाखेबंद अन् अभ्यासपूर्ण भाषण झाले, आपल्या भाषणाने त्यांनी पंतप्रधानांचेही मन जिंकले. पंतप्रधान मोदी यांनी देखील त्यांच्या भाषणात 'बहन पंकजा' असा उल्लेख करत महिला सशक्तीकरणाचे त्यांचे काम पाहून त्यांना शाबासकी दिली. ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणात यावेळी विभागाचा चढता आलेख मांडताना महिला सक्षमीकरणाची चळवळ महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविल्याचे जाहीर करताच महिलांनीही टाळ्यांच्या कडकडाटात त्याला उत्स्फूर्त दाद दिली.

राज्यस्तरीय सक्षम महिला मेळाव्यात दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर ना. पंकजाताई मुंडे यांनी बंजारा समाजाच्या महिला बचतगटांनी तयार केलेला दानपट्टा आणि सोलापूरच्या बचतगटांनी तयार केलेली मोदी यांची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले. नुतन राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, रावसाहेब दानवे आदी यावेळी उपस्थित होते. गौरी पूजनाचा सण असूनही राज्याच्या विविध भागांतून आलेल्या महिलांच्या लक्षणीय गर्दीने सर्वांचे लक्ष यावेळी वेधले. याप्रसंगी बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, हा मेळावा महिलांच्या सक्षमीकरणाचा नाही तर सरकारने आखलेल्या योजनांमुळे सक्षम झालेल्या महिलांचे उदाहरण सर्वांसमोर यावे, यासाठी आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ चा नारा दिला होता, त्यात आम्ही 'बेटी बढाओ' चा नारा देऊन महिलांना सशक्त करण्यासाठी पाऊल उचलले. आज बचतगटांचे काम कौतुकास्पद होत आहे. आजच्या महिलांची वाटचाल 'अबला' कडून 'सबला' कडे जात आहे. २०१४ मध्ये महिला बालविकास मंत्री म्हणून काम करत असताना बचतगटांचे काम दहा जिल्हयात होते, आता त्याची व्याप्ती वाढून ती ३४ जिल्हयामध्ये झाली आहे. पूर्वी बचतगटांची संख्या ५४ हजार १६९ होती, आता ती ४ लाख ५ हजाराच्या घरात पोहोचली आहे, एवढेच नव्हे तर ७ लाख घरावरून आम्ही ४३ लाख घरापर्यंत पोहोचलो आहोत. बचतगटांना दिल्या जाणा-या अर्थसहाय्याचा आकडा देखील ११७ कोटीवरुन ५१४ कोटी रूपये पोहोचला आहे. बचतगटांना शुन्य टक्के दराने कर्ज देणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य आहे

* बचतगटांचा प्रवास लोकल टू ग्लोबल स्वच्छता, पोषण, शिक्षण व आरोग्य याला प्राधान्य देत काम करत असताना राज्यातील महिला बचतगटांचा प्रवास लोकल टू ग्लोबल असा झाला आहे. इथल्या महिलांना आम्ही अमेरिकेत नेले, तिथे त्यांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली. फेसबुक, गुगल, अॅमेझाॅन, बिग बझार यासारख्या बड्या कंपन्यांना भेटी देऊन त्यांच्या सशक्तीकरणाला वाव दिल्याने त्या स्वयंपूर्ण झाल्या असे त्या म्हणाल्या. अस्मिता सारखी योजना राबवली. कृषी क्षेत्रातही आमच्या महिलांचे काम चांगले आहे, एक प्रकारे विविध योजना प्रभावीपणे राबवून महिलांना उद्योजक करण्याकडे आमची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आपण केलेल्या प्लास्टिकमुक्तीच्या आवाहनाला प्रतिसाद देत बचतगटांच्या महिलांनी कापडी पिशव्या तयार करण्यात मोठी आघाडी घेतल्याचे ना. पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.

* अन् पंतप्रधानांचे स्मितहास्य ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणात सुरवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्साही व्यक्तीमत्वाचे कौतुक केले. 'खुद से जितने की जिद है मुझे, खुद को ही हराना है, मै भीड नही हूं दुनिया की, मेरे अंदर एक जमाना है', अशा शेर म्हणताच पंतप्रधान मोदी यांच्या चेह-यांवर हास्याची लकेर उमटली. ' बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सिखो, मजबुरीयों को मत कोसो, हर हाल मे चलना सिखो' असे म्हणत त्यांनी मोदीजींच्या काम करण्याच्या क्षमतेला सलाम केला.

Saturday 7th of September 2019 08:15 PM

Advertisement

Advertisement