बुध्दीबळ स्पर्धेत योगेश्वरी कन्याशाळेचे सुयश
अंबाजोगाई (प्रतिनिधी ) अंबाजोगाई तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्या शाळेतील सहा खेळाडूंनी यश संपादन केले त्यांची निवड जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी झाली . विजयी स्पर्धकांमध्ये अवंती लोमटे ,आर्या केकान , स्वरा धायगुडे ,साक्षी वीर ,जागृती विर्धे ,ज्ञानदा वनवे यांचा समावेश होता . खेळाडूंना मार्गदर्शन क्रीडाविभाग प्रमुख अंजली रेवडकर यांनी केले . विजयी खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे पदाधिकारी डॉ. सुरेश खुरसाळे, अॅड. शिवाजीराव कराड, कमलाकरराव चौसाळकर, गणपत व्यास, प्रा. माणिकराव लोमटे, यशोदा राठोड, डॉ. शैलेश वैद्य मुख्याध्यापिका मीना कुलकर्णी व इतरांनी यांनी केले .
Saturday 23rd of September 2023 12:39 PM