Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

छत्रपती शाहू महाराज विद्यालयात वृक्षारोपन

वडवणी( प्रतिनिधी) :- सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असुन या काळात शासन मोफत व्रक्षारोपण अभियान प्रत्येक ग्रा.प.अंतर्गत राबवते आजच्या काळात व्रक्षारोपण करणे हि काळाची गरज असून यामध्ये वडवणी शहरातील छत्रपती शाहू महाराज विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष प्रा.सर्जेराव काळे,नगराध्यक्ष पुत्र बाबरी मुंडे, रोटरी क्लब अध्यक्ष डॉ. विजयकुमार निपटे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्रक्षारोपण करण्यात आले.

वडवणी येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालयात सतत सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात तरी व्रक्षारोपणचे महत्त्व ओळखून संस्थेचे अध्यक्ष प्रा. सर्जेराव काळे यांनी चांगले दर्जाचे झाडे लागवडीसाठी आणली यामध्ये काल बुधवार रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्रक्षारोपण करण्यात आले यावेळी बाबरी मुंडे, न.प.सभापती संजय उजगरे,रोटरी क्लब अध्यक्ष डॉ. विजयकुमार निपटे, संपादक अनिलराव वाघमारे, मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुका अध्यक्ष अँड. विनायक जाधव,पत्रकार सुधाकर पोटभरे, आय काँग्रेस ता.अध्यक्ष पांडुरंग मस्के, संतोष गोंडे, थापडे सर ,सचिनराव सलगर,वडमारे सर, शिंदे सर,कुरकुटे सर,राठोड सर,ईतापुरे सर,जोगदंड सर,रहाडे सर,कसबे सर,चोरमले सर,बालाजी काळे, अशोक शिंदे, शिवाजी कोकणार,गोकुळ बिल्पे,प्रा.ओमप्रकाश जाधव, यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते यावेळी संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल,श्रीफळ,पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला या वेळ सुत्रसंचालन प्रा.ओमप्रकाश जाधव यांनी केले.

Thursday 9th of July 2020 08:34 PM

Advertisement

Advertisement