ज्ञान, संस्कार, आहार व आरोग्यावर ज्ञानदीप विद्यालयात विद्यार्थ्याना आर्य समाजचे वतीने मार्गदर्शन
किल्लेधारूर - महाराष्ट्र नवनिर्माण अभियान व आर्य समाज धारूर यांच्या संयुक्त विद्यमाने 01 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यालयीन विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार, आहार व आरोग्य याविषयी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये ज्ञानदीप विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शक दयानंद महाविद्यालय लातूरचे सेवानिवृत्त प्रा चंद्रेश्वरजी शास्त्री यांनी विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार, आहार व आरोग्य याविषयी सखोल असे मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
महाराष्ट्र मानव निर्माण अभियान व आर्य समाज संस्थान किल्ले धारूर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानदीप विद्यालयातील विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार, आहार व आरोग्य या विषयी व्याख्यानमालेचे आयोजनकरण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणूणधारूर आर्य समाजचे प्रधान प्रमोदकुमार तिवारी होते तर प्रमुख मार्गदर्शक दयानंद महाविद्यालय लातूरचे सेवानिवृत्त प्रा. चंद्रेश्वरजी शास्त्री तसेच प्रमुख अतिथी म्हणून अभिषेकजी शास्त्री, अड प्रमोदकुमार मिश्रा सोमनाथअप्पा कांबळे, कमलाकर इंदूरकर उद्धव खाडे हे मान्यवर यावेळी उपस्थित मान्यवरांचे विद्यालयाच्या व स्वागत सत्कार करून केला उपस्थित मान्यवर अड मिश्रा व खाडे यांनी भजन व गीत गायन करत विद्यार्थ्यांमध्ये आनंददायी वातावरण निर्माण केले. या वेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना प्रा. चंद्रेश्वरजी शास्ञी या़नी विद्यार्थ्यानी शिस्त व नियोजनबध्द वागणे गरजेचे असुन आहार व आरोग्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहीजे. पूस्तकी ज्ञाना बरोबर समाजातील सर्व प्रकारचे ज्ञान अवगत केले पाहीजे आपले संस्कार व संस्कृती टिकवण्या साठी सतत प्रयत्न केला पाहीजे असे सांगीतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक मुंजाराम निरडे तर आभार शिक्षक सचिन चव्हाण यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते.