Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

गेवराई - शेवगाव फाटा येथे औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्ग 52 वर दि. 16 सप्टेंबर रोजी गोवर्धन बाबासाहेब चिमणेेे (वय 42) हे त्यांची मोटार सायकल वर बसून विठ्ठलनगर गेवराईकडे जात असताना त्यांना भरधाव वेगातील कारने पाठीमागून जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी गुन्हा  दाखल झाला आहे.

प्राप्त माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील गौडगाव येथील दुध व्यवसायीक शेतकरी गोवर्धन बाबासाहेब चिमणेेे (वय 42)े हे दि.16 सप्टेंबर रोजी त्यांची होंडा शाईन मोटार सायकल क्रं.एम.एच.23.ए.पी.3696 वर बसून विठ्ठलनगर गेवराईकडे जात असताना शेवगाव रोड फाटा वर त्यास पाठीमागून औरंगाबाद रोडकडून येणार्‍या पांढर्‍या रंगाच्या कार चालकाने त्यांच्या ताब्यातील वाहन हायगई, निष्काळजीपणे चालवून मोटार सायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. यात गोवर्धन हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर धडक देणार्‍या वाहन चालकाने कुठलीही माणूसकी न दाखवता, जखमीला मदत केली नाही. जखमीचा भाऊ गोविंद बाबासाहेब चिमणे (वय 45) यांच्या फिर्यादीवरून गेवराई  पोलिस ठाण्यात दि.22 सप्टेंबर रोजी कार चालक व वाहन क्रं.एम.एच.12.जी.व्ही.8000 या वाहनावर गुन्हा रजि.नं.503/2023 कलम 279, 337, 338 भादंवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार हंबर्डे हे करीत आहेत.

Sunday 24th of September 2023 09:19 AM

Advertisement

Advertisement