Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

पात्रूडमध्ये विहीरीत 30 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला

पात्रूड  - एका विहिरीत 30 वर्षीय इसमाचा मृतदेह तरंगत असल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसांना ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेह विहीरीबाहेर काढला आहे. अद्याप तरी या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. ही आत्महत्या आहे की, खून ? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

माजलगाव तालुक्यातील पात्रूड शिवारातील कुरेशी अहेमद मियॉ यांच्या शेतातील विहीरीत एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. याची माहिती पात्रूडचे माजी उपसरपंच शेख युसुफ यांना दिल्यानंतर त्यांनी माजलगाव ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी ग्रामीणचे एपीआय विजयसिंह जोनवाल यांनी भेट दिली असून मृतदेह विहिरीबाहेर काढला. अंदाजे चार ते पाच दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत व्यक्तीची ओळख पटली नसून त्याच्या अंगावर पांढरा टिशर्ट आणि जिन्स पॅन्ट आहे. ही आत्महत्या की खून? याचा पोलीस तपास करत आहेत.

Saturday 27th of May 2023 05:08 PM

Advertisement

Advertisement