Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

४० हजारांची लाच मागितली; अंबाजोगाई शहर ठाण्यातील फौजदारावर गुन्हा

अंबाजोगाई - दिड महिन्यापूर्वी दाखल गुन्ह्यातील आरोपींवरील प्रतिबंधक कारवाई बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेत न करता अंबाजोगाईच्या तहसील कार्यालयात करण्यासाठी ४० हजारांची लाच मागितल्याच्या आरोपावरून अंबाजोगाई शहर ठाण्यातील फौजदारावर गुन्हा दाखल करण्यात आला. बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कार्यवाही केली. 

 दिड महिन्यापूर्वी अंबाजोगाई शहर ठाण्यात पाच जणांवर शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाळ सूर्यवंशी यांच्याकडे होते. सदर गुन्ह्यातील आरोपींवर प्रतिबंधक कारवाई बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेत न करता अंबाजोगाईच्या तहसील कार्यालयात करण्यासाठी सूर्यवंशी यांनी ५० हजार रुपयांचा लाचेची मागणी केली. मात्र, लाच देण्याची तयारी नसल्याने तक्रारदाराने याबाबत बीडच्या एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता सूर्यवंशी यांनी तडजोडीअंती ४० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. दरम्यान, एसीबीने दोन वेळेस सूर्यवंशी यांना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. परंतु, सूर्यवंशी यांनी रक्कम स्वीकारली नाही. अखेर, तक्रारदाराच्या फिर्यादीवरून ४० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी फौजदार सूर्यवंशी यांच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही कार्यवाही बीड एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे आणि त्यांच्या पथकातील पोलीस अमंलदार  सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, हनुमान गोरे, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, चालक गणेश म्हेत्रे यांनी पार पाडली.

Wednesday 11th of May 2022 07:53 PM

Advertisement

Advertisement