Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

मुलीला धडक देऊन कार चालक फरार; गुन्हा दाखल

अंबाजोगाई: भरधाव वेगात व निष्काळजीपणे कार चालवून मुलीला धडक देऊन कार चालक फरार झाल्याची घटना केंद्रेवाडी पाटीजवळ असलेल्या न्यू गार्डन हॉटेल च्या समोर बुधवारी (दि. १) घडली. याप्रकरणी कार चालकावर पोलीसात गुन्हा दाखल झाला  आहे.
केंद्रेवाडी येथील अंजना माणिकराव ब्रिंगणे (वय: ३५) या धारूर रोडवर असलेल्या केंद्रेवाडी शिवारातील रस्त्याने आपल्या मुलीसोबत जात होत्या. यावेळी पांढऱ्या रंगाची कार (एम. एच. ४४.३३३४) चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवून मुलीला धडक देऊन जखमी केले. तो वाहन न थांबवता धारूर च्या दिशेने भरधाव वेगात निघून गेला. या प्रकरणी अंजना ब्रिंगणे यांच्या फिर्यादीवरून पांढऱ्या रंगाची कार (एम. एच. ४४.३३३४) चा चालक याच्याविरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक तेजस वाहुळे पुढील तपास करीत आहेत.

Friday 3rd of December 2021 07:21 PM

Advertisement

Advertisement