Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

शाळांमध्ये कोव्हीड नियमांचे पालन करा

आ.नमिता मुंदडांनी विविध शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी साधला संवाद

अंबाजोगाई- दिड वर्षानंतर प्राथमिक विभागाच्या शाळा सुरू झाल्या. उत्साहाने शाळेत जाणाऱ्या मुलांच्या आनंदात आ. नमिता मुंदडा ही सहभागी झाल्या. अंबाजोगाई शहरातील विविध शाळेत जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधत कोव्हीड विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन ही आ. नमिता मुंदडा यांनी केले.


गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळांमध्ये किलबिलाट सुरू झाला आहे. अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी विद्यालय मेडिकल परिसर, खोलेश्वर विद्यालय, श्रीमती गोदावरी कुंकुलोळ कन्या शाळा, या शाळांना आ.नमिता मुंदडा यांनी गुलाबपुष्प भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. दिड वर्षे घरात राहुन कसा कंटाळा आला होता. मित्र, मैत्रिणी, शिक्षक यांच्या आठवणी, अशा विविध गोष्टी विद्यार्थ्यांनी आ. नमिता मुंदडा यांच्याशी हितगुज करत सांगितल्या. यावेळी अनंत अरसुडे, कल्याण काळे, गोपाळ मस्के, डॉ निशिकांत पाचेगावकर शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका यांची उपस्थिती होती.

Friday 3rd of December 2021 07:14 PM

Advertisement

Advertisement