Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

राधाकृष्ण नगरीत घरफोडी; ४७ हजारांचा माल लंपास

अंबाजोगाई: घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत भरदिवसा घरफोडल्याची घटना पोखरी रोडवर असलेल्या राधाकृष्णनगर येथे गुरुवारी (दि. २) घडली. यावेळी चोरट्यांनी ४७ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल पळवला.
राधाकृष्ण नगरीत राहणारे सुरज भीमराव गायकवाड (वय: २९) हे आपली पत्नी व मुलासह घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते. याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातील तिजोरी मधील ठेवलेले सोन्याचे दागिने व नगदी रुपये असा ४७ हजार १८५ रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी सुरज गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस जमादार दहिरे पुढील तपास करीत आहेत.

Friday 3rd of December 2021 06:45 PM

Advertisement

Advertisement