Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

डॉ.बापूसाहेब काळदाते स्मृती वक्तृत्व स्पर्धा अंबाजोगाईत संपन्न

अंबाजोगाई ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी राहावी ' - आ. सतीशभाऊ चव्हाण

 दि 2 डिसेंबर 2021 यशवंत सभागृह, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई येथे संपन्न झालेल्या डॉ. बापूसाहेब काळदाते स्मृती मराठवाडा विभागीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात "अंबाजोगाई ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी रहावी" असे प्रतिपादन पदवीधर आमदार मा.श्री.सतीश भाऊ चव्हाण यांनी केले.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र- अंबाजोगाई, नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठान, अंबाजोगाई, बापू-सुधा काळदाते प्रतिष्ठान, औरंगाबाद आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई यांच्या वतीने ही स्पर्धा दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात आली. कोरोनाची पार्श्वभूमी आणि एसटी बसेस बंद असतानासुद्धा मराठवाड्यातील विविध महाविद्यालयातील खूप विद्यार्थ्यांनी या स्पर्धेला प्रत्यक्ष हजर राहून प्रतिसाद दिला आहे.  सकाळी  9:30 वाजता मा. दत्ता बाळसराफ, मा. अमर हबीब,  यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यावेळी श्री अमर हबीब यांनी डॉ. बापूसाहेब काळदाते यांच्या संघर्षमय जीवनाच्या वाटचालीचा आदर्श समोर ठेवून आजच्या तरुणांनी मार्गक्रमण करावे असा संदेश दिला. त्यानंतर तीन सभागृहात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये प्रथम- दत्ता बाबाहरी घुगे, दितिय- कु. तेजस्विनी नाथराव केंद्रे, तृतीय- प्रतीक उत्तम पवार, उत्तेजनार्थ-1)कु.मानवी विकास जाधव,2) पल्लवी किरण हाके या स्पर्धकांनी यश संपादन केले. दुपारी 05.00 वाजता मा. आ. सतीशभाऊ चव्हाण, आ. संजय भाऊ दौंड,  नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, मा. दत्ता बाळसराफ, डॉ नरेंद्र काळे,मा.अमरभैय्या देशमुख, मा. बालाजी शेरेकर, प्राचार्य डी. बी तांदूळजेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या स्पर्धेचे मुख्य समन्वयक मा. डॉ नरेंद्र काळे यांनी केले. अंबाजोगाई ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे ती तशीच कायम राहिल. तिच्या विकासासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असे प्रतिपादन पदवीधर आमदार मा. सतीशभाऊ चव्हाण यांनी केले. मा. दत्ता बाळसराफ यांनीही आंबेजोगाईच्या शैक्षणिक, सांस्कृतिक अंगावर प्रकाश टाकला. डॉ सुनीता सांगोले, डॉ शैलजा बरुरे,डॉ मुकुंद राजपंखे, श्री भागवत मसने, श्री हनुमंत धायगुडे, प्रा. सागर कुलकर्णी यांनी स्पर्धकांचे परीक्षण केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मा. जी.जी रांदड, मा. अनिकेत भैय्या लोहिया, मा. दगडू दादा लोमटे, मा. अभिजीत जोंधळे, प्राचार्य डी बी तांदूळजेकर, उपप्राचार्य रमेश शिंदे, उपप्राचार्य प्रताप जाधव यांनी तसेच श्री बालाजी शेरेकर, प्रा सुरेश पाटील ईर्लेकर, श्री गोविंद टेकाळे, श्री रणजीत मोरे, डॉ.अभ्युदय चौधरी, श्री आशिष जाधव,सलीम शेख, श्री विलास काचगुंडे यांनी प्रयत्न केले.

Thursday 2nd of December 2021 08:18 PM

Advertisement

Advertisement