Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

सिरसाळ्याच्या दरोड्यातील एक दरोडेखोर जेरबंद

परळी : तालुक्यातील सिरसाळा येथील गॅस एजन्सी चालकाच्या घरावर दरोडा टाकून चाकूचा धाक दाखवत दरोडेखोरांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केला होता. या दरोड्याचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि सिरसाळा पोलिसांना यश आले असून एका दरोडेखोरास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

अधिक माहिती अशी की, ६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री चार अनोळखी चोरट्यांनी गॅस एजन्सी चालक संपती गंगाधर पुरी यांच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ५३ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सिरसाळा पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने कसून तपास सुरु केला. तपासा दरम्यान चोरट्यांची संख्या चार नसून सहा असल्याचे निष्पन्न झाले. अखेर पोलिसांच्या तपासाला यश आले आणि सिद्धार्थ उर्फ कामठ भैय्या चव्हाण (वय २२, रा. खंडाळा, ता.पैठण) हा दरोडेखोर जाळ्यात सापडला. त्याने गुन्ह्याची कबुली देताच पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी, चाकू सोन्याचे दागिने जप्त केले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता बुधवार (दि.०१) पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

उर्वरित आरोपींच्या शोधासाठी दोन पथके

दरम्यान, दरोड्यातील फरार इतर ५ आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके नेमली आहेत. सादर आरोपींवर बीड, जालना, औरंगाबाद जिल्ह्य़ात खुनासहीत दरोडा, घरफोडी, दरोडा असे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी दिली.

Tuesday 30th of November 2021 10:18 PM

Advertisement

Advertisement