Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

तहसीलदार व मा.ग्रा.बँक शाखा वडवणीच्या व्यवस्थापकांना , शेतकर्‍यांच्या विविध न्याय मागण्या संदर्भात निवेदन

वडवणी ,(प्रतिनिधी):- खरीप हंगामातील लागवडीला वेग आला असून. शेतकर्‍यांना  शेतीच्या कामासाठी आर्थिक मदतची आवश्यकता असते म्हणून शेतकरी संबधीत बँकेकडे पीक कर्जाची मागणी करत असतात.व तसेच शेतकर्‍यांना त्याच्या पिकांसाठी पिक वीमा संरक्षण असण गरजेचे असत .कारण उद्या नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कारणाने पीकांच नुकसान झाले तर पिक विमा संरक्षण हे आर्थिक आधार म्हणून कामाला येते व  निवेनातील शेतकर्‍यांच्या प्रमुख मागण्या-  -१) शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे शेतकर्‍यांना पिक कर्ज वाटप कराव. २) पिक  कर्जापासुन वंचित असलेल्या नविन खातेधारकांना पिक कर्ज वाटप कराव. तसेच संबधीत बँकांना सक्त निर्देश देऊन कर्ज वाटप करावे . ३) जुने पिक कर्ज धारकास नवीन वाढिव कर्ज देण्यात यावे. 

४.महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत पात्र खातेधारकास तात्काळ पिक कर्ज वाटप करण्याचे यावे. ५)खरीप हंगाम २०२०साठी बीड जिल्ह्यासाठी तात्काळ विमा कंपनी निश्चित करावी व पिक विमा स्वीकारून शेतकर्‍यांची अनिश्चितेची धास्ती संपवावी. ६) संदोष सोयाबीन बियाणे उगवले नाही अशा शेतकर्‍यांचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी व संबंधित कंपनीवर तातडीने कारवाई करावी .इत्यादी न्याय मागण्याचे निवेदन देण्यात आले व तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारून या मागण्या संदर्भात सकात्मक चर्चा करून कार्यवाही करण्याचे आश्वस्त केले. मा. ग्रा .बँक. शाखा वडवणी च्या व्यवस्थापकांनी सुद्धा बँके संदर्भात केलेल्या मागण्यावर सकात्मक चर्चा करून नविन खातेधारकास लवकरात लवकर कर्ज वाटप करू अस आश्वस्त केले. वरील सर्व मागण्यांवर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास किसान सभा व शेतकरी  या करोना साथरोग काळात  शारीरिक अंतराचे सर्व नियम पाळून जोरदार आंदोलन करतील असा झशार देण्यात आला. व हे निवेदन,   ओम पुरी,  गणेश आबुंरे, मोहन आगे, सत्यजित मस्के, शेख पाशा, इत्यादींनी दिले.

Tuesday 7th of July 2020 08:21 PM

Advertisement

Advertisement