शेतात बैल बांधण्याच्या कारणावरून डोक्यात खोरे घातले; तिघांवर गुन्हा
गेवराई : शेतात बैल का याचा जाब विचारल्याने भावकीतील वाद पेटला. यावेळी झालेल्या हाणामारीत लोखंडी खोरे डोक्यात मारल्याने एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी गेवराई तालुक्यातील तांदळा येथे घडली.
येथील शेतकरी अशोक जालिंदर सिरसाट हे आई आणि पत्नीसमवेत दगडी नामक शेतात कापसाची खुरपणी करत होते. यावेळी तिथे त्यांच्या भावकीतील श्रीहरी नरहरी सिरसट व त्याचा मुलगा किशोर व पत्नी मीना हे तिघे तिथे आले. त्यांनी अशोक यांच्या शेतातील मोकळ्या जागेत बैल बांधले. अशोक यांनीयाबाबत जाब विचारला असता चिडलेल्या त्या तिघांनी खोरे डोक्यात मारून अशोक यास गंभीर जखमी केले. अशोकची आई आणि पत्नी यांनी त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघींनाही मारहाण करण्यात आअली. तिन्ही आरोपींवर चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहा.फौजदार थोरात करत आहेत.