Breaking News

  • मांजरसुंबा-पाटोदा रोडवर भीषण अपघात; ७ जण जागीच ठार..

18 प्रशिक्षणार्थी आयएएस प्रशासकीय अधिकारी जिल्हा अभ्यास दौऱ्याव

अभ्यास दौऱ्यामध्ये बैठक आणि शिवार भेटीद्वारे घेतली जिल्ह्याची माहिती

बीड : भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षण घेत असलेले अठरा आयएएस प्रशासकीय अधिकारी यांनी आज जिल्हा अभ्यास दौऱ्यावर येत जिल्ह्यातील विविध विषयांची माहिती घेतली आज सकाळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकी दरम्यान जिल्ह्यातील विविध कामांच्या माहितीचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये जिल्ह्याने विशेषत्वाने देशपातळीवर गौरव प्राप्त केलेल्या पंतप्रधान पिक विमा योजनेच्या अंमलबजावणीसह जलयुक्त शिवार तसेच विविध योजनांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिरी, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, मंडळ अधिकारी श्री राख आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, दीनदयाल अंत्योदय योजना, उमेद अभियान, कौशल्य विकास, महिला विकास आणि अस्मिता योजना यांची माहिती देण्यात आली .

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी यांनी आज जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या कामांची पाहणी केली. या अभ्यास दौऱ्यामध्ये त्यांनी मांजरसुंबा, नेकनूर आणि सफेपुरा येथील शिवार भेट देऊन सिंचन कामे, शेततळे आणि फळबागांमध्ये माहिती घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील, तालुका कृषी अधिकारी जाधव, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या भेटीनंतर नेकनुर येथे शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी मनमोकळी चर्चा केली . या चर्चेमध्ये पंतप्रधान विमा योजना, सिंचन तसेच महिला सक्षमीकरण, बचत गट, रब्बी व खरीप हंगामातील पीक परस्थिती, टॅंकर व दुष्काळी स्थितीमध्ये शेती व्यवस्थापन अशा विविध विषयांच्या अंगाने त्यांनी उपस्थित गावकर्‍यांना प्रश्न विचारले. यावेळी गावचे सरपंच दादाराव काळे, जलतज्ज्ञ संजय शिंदे, तसेच ग्रामपंचायत सदस्य जयदीप काळे, सतीश मुळे, गोरख काळे, फुलचंद काळे, राकेश शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला. यावेळी ग्रामस्थांनी विविध जलसंधारण कामांमुळे गावातील पाणी पातळीमध्ये वाढ झाली असून त्यामुळे गावासाठी या वर्षापासून एकही टॅंकरची आवश्यकता भासत नसल्याचे माहिती दिली तसेच रब्बी हंगामात देखील विविध प्रकारच्या पिकांची लागवड झाली असल्याचे सांगितले. आजच्या अभ्यास दौऱ्यात प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी नेकनूर येथील बाळू कदम यांच्या सीताफळ बागेचे तसेच सफेपुरा येथील खंडू साबळे यांच्या शेततळ्याची पाहणी केली.

Monday 13th of January 2020 07:45 PM

Advertisement

Advertisement